नागरिकांना दुसऱ्या डोसचे गांभीर्य नाही; लशींचा साठा पडून

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मनमाडकरांनी लसीकरणाकडेही दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. शहरातील असंख्य नागरिकांनी पहिला डोस घेतलेला असला तरीही दुसऱ्या डोसचे गांभीर्य अनेकांना नाही.
covid vaccine
covid vaccineesakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मनमाडकरांनी लसीकरणाकडेही (Vaccination) दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. शहरातील असंख्य नागरिकांनी पहिला डोस घेतलेला असला तरीही दुसऱ्या डोसचे गांभीर्य अनेकांना नाही, असेच चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लशींचा तुटवडा झाला होता. मात्र लस मिळण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत होत्या. आता मात्र आरोग्य प्रशासनाकडे लशींचा साठा पडून असला तरीही नागरिक लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

लसीकरणाकडे दुर्लक्ष

देशाने लसीकरणात शंभर कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी मनमाड शहर आणि नांदगाव तालुका लसीकरणापासून मात्र खूपच दूर आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत आकडेवारीनुसार मनमाड शहरात ८२ हजार ४८० इतकी लोकसंख्या गृहीत धरण्यात आली. त्यापैकी ६० हजार ६०६ पात्र लाभार्थ्यांपैकी २६ हजार ६१६ लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला. ही टक्केवारी लोकसंख्येच्या ४३.९२ टक्के इतकी आहे. तर शहरातून सात हजार ९८४ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. ही टक्केवारी १३.१९ टक्के इतकी आहे. तर नांदगाव शहरात २३ हजार ६०४ लोकसंख्या गृहीत धरून १७ हजार ३४४ लाभार्थ्यांपैकी नऊ हजार २०० लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे. ही टक्केवारी ५३.४ टक्के इतकी आहे. तर चार हजार १०२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ही संख्या ही आकडे टक्केवारी २३.५ इतकी आहे. मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यात १६ जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहीम सुरू झाली. सुरवातीला लसीकरण करून घेण्यासाठी मनमाड केंद्रावर मोठ्या रांगा लागत होत्या. गर्दीमुळे लसीकरणाचे नियोजन कोलमडले होते. तरीदेखील नागरिकांनी गर्दी करत लसीकरणाला हातभार लावला. सध्या मनमाड शहरात शासकीय दोन केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे. पण त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. मात्र उपरोक्त आकडेवारी ही सरकारी आकडेवारी आहे.

covid vaccine
पगारवाढी करारानेच केला घात; Bosch कंपनीचे 730 कामगार संतप्त

लसीकरणाची संख्या कमी ही चिंतेची बाब

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेल्यामुळे लसीकरण करण्यासाठी नागरिकांमध्ये फारसे स्वारस्य दिसून येत नाही. त्यामुळे सध्या लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी मंदावली आहे. नांदगाव तालुक्यात केंद्रावर पहिला डोस २७ हजार ३३ एकूण ५७.३४ टक्के, तर दुसरा डोस सात हजार २३० इतका असून, १५.३ टक्के, पिंपरखेड केंद्रावर पहिला डोस १७ हजार १९९ असून, ५६ टक्के, तर दुसरा डोस चार हजार ३५४ असून, १४.२६ टक्के, न्यायडोंगरी केंद्रावर ११ हजार ६६ इतका (६८.८४ टक्के), तर दुसरा डोस तीन हजार ४५४ म्हणजे २१.४९ टक्के, केंद्रावर पहिला डोस सोळा हजार ६०२ (४९.२२) टक्के, तर दुसरा डोस चार हजार ४८५ लाभार्थी (१३.५० टक्के), बोलठाण केंद्रावर पहिला डोस १२ हजार ९४७ (५१.४० टक्के), तर दुसरा डोस तीन हजार ५९६ लाभार्थी (१४.२८ टक्के) इतके असून, नांदगाव ग्रामीण पहिला डोस लाभार्थी ८४ हजार ६०७ (५५. ५९टक्के), दुसरा डोस लाभार्थी २३ हजार ११९ (१५.१ टक्के) अशी आहे. कोरोना लशींचे शंभर कोटी डोस देण्याचा ऐतिहासिक टप्पा गुरुवारी देशाने ओलांडला आहे. अवघ्या दहा महिन्यात देशाने ही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. ही अभिमानाची बाब असली तरी मनमाड शहर परिसरासह नांदगाव तालुक्यात मात्र लसीकरणाची संख्या कमी असल्याने ही चिंतेची बाब मानली जात आहे.


covid vaccine
धूमधडाक्यात विवाहांमुळे अर्थकारण बदलणार! 15 नोव्हेंबरनंतर सुरूवात

''सरकारी लसीकरण केंद्रांवर ज्यांनी लसीकरण केली त्यांची नोंद केली आहे. पण सुरवातीला अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी, बाहेरगावी आणि खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण करून घेतले असल्याने त्याची नोंद मात्र सरकारी दप्तरी नसल्यामुळे लसीकरणाची सध्याची आकडेवारी अत्यल्प प्रमाणात आहे.'' - डॉ. संतोष जगताप, तालुका आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.