भागात कोणत्याही कंपनीचे मोबाईल टॉवर नाही. त्यामुळे सर्व शंभर ते सव्वाशे गावात मोबाईलची रेंजच नाही. परिसरातील नागरिकांना आउट गोइंग कॉलसाठी रेंज शोधत एक- दीड किलोमीटर उंच डोंगरावर जावे लागते.
मूलवड (नाशिक) : जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग गुजरात व काही प्रमाणात पालघर जिल्ह्याला जोडणारा सीमावर्ती आदिवासी प्रदेश आहे. हा भूभाग बोरीपाडा, चिंचओहळ, देवडोंगरा, ओझरखेड, खडकओहळ, मूलवड, करंजपाना, चौरापाडा, बेरवळ, कौलपोंडा, रायते, सावरपाडा, वळण, धायटीपाडा अशा सुमारे शंभर सव्वाशे लहान-मोठ्या गावांना जोडत जवळपास सत्तर किलोमीटर पसरलेला आहे. जवळपास तीस ते पस्तीस हजारावर लोकसंख्या असलेल्या हा भाग डिजिटल जमान्यात सुद्धा ऑनलाइन सुविधांच्या बाबतीत मागासलेला आहे. आजपर्यंत सरकारकडून सर्वच बाबतीत दुर्लक्षित राहिला आहे. (people are suffering due to lack of mobile network in the western border areas of Nashik district)
या भागात कोणत्याही कंपनीचे मोबाईल टॉवर नाही. त्यामुळे सर्व शंभर ते सव्वाशे गावात मोबाईलची रेंजच नाही. परिसरातील नागरिकांना आउट गोइंग कॉलसाठी रेंज शोधत एक- दीड किलोमीटर उंच डोंगरावर जावे लागते. यामुळे या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रमशाळा व जि. प. शाळेतील हजारो विद्यार्थी व शिक्षकांचा ऑनलाइन शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी शाळांना दिलेले प्रोजेक्टरदेखील धूळखात पडलेले आहेत. शाळांची ऑनलाइन कार्यालयीन कामे करण्यासाठी हरसूल किंवा नाशिकची वाट धरावी लागते. नागरिकांना ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाचे ऑनलाइन दाखले काढण्यासाठी व इतर कामांसाठी पन्नास किलोमीटर अंतर कापून हरसुल, ठाणापाडा येथे जावे लागते. हरसूल, ठाणापाडा येथील मोबाईल रेंज डोंगरांमुळे या भागात पोचू शकत नाही. या भागातील मोबाईल ग्राहकांची संख्या अठरा ते वीस हजारावर आहे. त्यांना रेंजसाठी गेल्या दोन दशकांपासून गुजरातच्या रेंजवर अवलंबून राहावे लागते.
अजूनही राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन या भागात एकही मोबाईल टॉवर उभे करू शकले नाही. या समस्यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
(people are suffering due to lack of mobile network in the western border areas of Nashik district)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.