रस्त्यात पडले खड्डे; वृक्षारोपण करत ग्रामस्थांची गांधीगिरी

Peoples planting trees in potholes using Gandhigiri
Peoples planting trees in potholes using Gandhigiriesakal
Updated on

सटाणा (जि. नाशिक) : येथील पालिका प्रशासनाने गेल्या वर्षी प्रभाग क्रमांक तीनमध्ये जलवाहिनीच्या कामासाठी सर्व रस्ते खोदून ठेवल्याने परशुराम कॉलनीतील पालिका मुख्याधिकारी निवासस्थान ते नगराध्यक्ष संपर्क कार्यालयापर्यंतच्या इतर नववसाहतींना जोडणाऱ्‍या मुख्य रस्त्याची वाताहत झाली आहे. दुरुस्तीबाबत वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ संतप्त स्थानिक रहिवाशांनी शनिवारी (ता. २१) या रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने गांधीगिरी आंदोलन छेडले. येत्या चार दिवसांत या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

खड्ड्यात पावसाचे पाणी आणि रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

गेल्या वर्षी पालिका प्रशासनाने जलवाहिनीच्या कामासाठी नववसाहतींमधील चांगल्या अवस्थेतील खोदलेल्या रस्त्यांची ठेकेदाराने अद्यापही दुरुस्ती केलेली नाही. रस्त्याच्या कडेला असलेला मातीभराव आणि खोदकामामुळे यंदा ऐन पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. प्रभाग तीनच्या परशुराम कॉलनीतील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून, चिखलाचे साम्राज्यही पसरले आहे. या चिखलात अनेक वाहने फसतात, तर दुचाकी घसरून अपघातही होत आहेत. खड्ड्यात वाहने आदळल्याने वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. स्थानिक रहिवाशांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले असून, बाहेरून येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पादचाऱ्‍यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.

Peoples planting trees in potholes using Gandhigiri
कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याची बदली; अवघा गाव झाला भावूक!

वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन सुस्थ

मुख्य रस्त्याच्या एका बाजूला पालिकेच्या मुख्याधिकाऱ्‍यांचे निवासस्थान, तर दुसऱ्‍या बाजूला नगराध्यक्षांचे संपर्क कार्यालय असून, दररोज या रस्त्यावरून त्यांची ये-जा असते. मात्र, रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. आंदोलनात प्रवीण बधान, संदीप पवार, मोहन देवरे, बाळासाहेब देवरे, रवींद्र निकम, मिलिंद अहिरे, भूषण हरणे, मधुकर चव्हाण, श्‍याम बगडाने, प्रवीण येवला, साहेबराव गरुड, सुधीर फेगडे, के. बी. सोनवणे, योगेश सिसोदे, देवेंद्र चव्हाण, दीपक निकम, डी. पी. सूर्यवंशी, सुयोग अहिरे, हर्षल जाधव, देवा पवार, बंकेश अंधारे, डी. पी. रौंदळ, नानू भामरे, विकास चव्हाण, दीपक सिसोदे, रमेश भामरे, हितेश देसले, डी. बी. चव्हाण, योगेश बधान, लक्ष्मण कापडणीस, श्‍याम कापडणीस, धनंजय जाधव आदींसह नागरिक सहभागी झाले होते.

Peoples planting trees in potholes using Gandhigiri
शरद पवारांमुळेच मराठवाडा विद्यापीठ नामांतर - छगन भुजबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.