खासगी विद्यापीठांत प्रवेशासाठी ‘पेरा सीईटी’

pera CET
pera CETesakal
Updated on

नाशिक : पेरा इंडिया (प्रीमिनंट एज्युकेशन ॲन्ड रिसर्च असोसिएशन) ही महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांची संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून विद्यापीठांतील विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन पेरा सीईटी २०२१ परीक्षा होणार आहे. राज्‍यभरात १६ जुलैपासून ही परीक्षा पार पडेल. संघटनेने पेरा सीईटी २०२१ घेण्याची घोषणा केली आहे. १६ ते १८ जुलैदरम्‍यान ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. या सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी १० जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे. परीक्षेचा निकाल २३ जुलैला जाहीर होईल, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी दिली. (PERA-CET-for-admission-in-private-universities-nashik-marathi-news)

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला मिळणार गती

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, की पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सीईटीद्वारे प्रवेश देण्यात येणार आहेत. शासनाच्या सीईटी परीक्षाव्यतिरिक्त खासगी विद्यापीठांच्या संघटनेने घेतलेल्या सीईटीच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येतो म्हणून पेरा इंडिया या खासगी विद्यापीठांच्या संघटनेने ही सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासगी विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला गती मिळेल.

pera CET
पाकचा कांदा भारतापेक्षा सात रुपये किलो स्वस्त

‘पेरा सीईटी’च्या आधारे विद्यार्थ्यांना राज्‍यातील १३ खासगी विद्यापीठांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येणार आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना घरात बसूनच ही सीईटी परीक्षा देता येईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

pera CET
मुलांनी वाऱ्यावर सोडलेला जन्मदाता चितेवर रचतोय लाकडं..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()