Nashik News : थायलंड देशातील पेराडा पुमखाचोरन हिने शिक्षणासाठी नाशिक गाठले आहे. तिने केटीएचएम महाविद्यालयात इयत्ता अकरावीला प्रवेश घेतला आहे.
एएफएस इंटर कल्चरल प्रोग्रॅमअंतर्गत ती नाशिकला आली असून, वर्षभर योगिता आणि शिवाजी शिंदे यांच्या कुटुंबासोबत राहणार आहे. (Perada from Thailand came to Nashik to study News)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
एएफएस या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून आंतरसांस्कृतिक शिक्षणाच्या संधी प्रदान करते. याअंतर्गत दरवर्षी विविध देशांतून विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत असतात. येथे शिक्षण घेताना स्थानिक कुटुंबात सदस्याप्रमाणे राहात असतात.
नुकताच थायलंड येथून पेराडा आलेली आहे. तिचे स्वागत मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, केटीएचएमचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. भास्कर ढोके, प्रा. बी. डी. पाटील, प्रा. दौलत जाधव यांनी केले.
डीलीजंट बॅचचे समन्वयक डॉ. कैलास शिंदे, प्रा. जी. एस. खुळे एएफएसचे अध्यक्ष प्रमोद कांगुणे, उपाध्यक्ष संतोष गायकवाड, समन्वयक जीवन शिंदे, स्वयंसेवक शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.