नाशिक रोड : शिक्षण क्षेत्रात परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये (पीजीआय) नाशिक महाराष्ट्रात पहिला स्थानावर आले आहे. शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली. (Performance Grading Index Nashik ranks first in Maharashtra in PGI Nashik news)
भारतात दर दोन वर्षांनी गुणवत्तेशी संबंधित विद्यार्थ्यांचे अध्ययन, शिक्षकांचे अध्यापन, शाळांमधील भौतिक व शैक्षणिक सुविधा याचे मूल्यमापन करून शाळांची जिल्ह्यानुसार प्रतवारी घोषित केली जाते. यामध्ये देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून, नाशिक जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या स्थानावर आहे.
नॅशनल अचिव्हमेंट सर्वेच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता तपासली जाते. याद्वारे शिक्षक प्रशिक्षित आहे का? विद्यार्थ्यांना ते योग्य अध्यापन करत आहेत का? विद्यार्थी अध्ययन करतात का? विद्यार्थ्यांची आकलन क्षमता कशी आहे? विद्यार्थी, शिक्षकांची शाळांमध्ये उपस्थिती, हजेरी, विविध शाळा बाह्य उपक्रम, स्पर्धा परीक्षासंबंधी उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम, ज्ञानरचना वादासंबंधी उपक्रम आदी बाबी तपासल्या जातात.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने यासंबंधी महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांची प्रतवारी केलेली आहे. यात नाशिक प्रथम, चंद्रपूर द्वितीय, उस्मानाबाद तृतिय, कोल्हापूर चौथे, तर यवतमाळ पाचव्या स्थानावर आहे. सर्वात शेवटचा ३६ वा क्रमांक अमरावती जिल्ह्याचा लागतो. दरम्यान, शिक्षण क्षेत्रात परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये नाशिक जिल्हा पहिल्या स्थानावर आल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
"परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सच्या संदर्भात नाशिक पहिल्या स्थानावर आल्याचा अत्यानंद होत आहे. हे एक टीम वर्क असून, वेळोवेळी ऑनलाईन मीटिंग, अधिकाऱ्यांनी शिक्षकांना विविध गोष्टींसंबंधी अद्ययावत ठेवावे. शिक्षकांनीही अलर्ट राहुन काम पूर्ण केल्याची ही पावती मी समजतो." -डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षण उपसंचालक. सफेद शर्ट...
"नाशिकला नवनवीन शैक्षणिक प्रयोग होत आहेत. गुणवत्ता आणि शिस्त या गोष्टींमध्ये नाशिकची पकड असल्यामुळे महाराष्ट्रात नाशिक पहिल्या स्थानावर येऊ शकले आहे. नवनवीन शिक्षण संस्थांच्या उदयामुळे नाशिक हे नवे एज्युकेशनल कल्चरल झोन झाले आहे. याचे श्रेय शाळेत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना जाते." -डॉ. डी. एम. गुजराथी, प्राचार्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.