Nashik News : गळफास घेताना बेडसीट फाटले पण.... असा झाला मृत्यु

Death News
Death Newsesakal
Updated on

Nashik News : नशिबाने जगण्याची एक संधी दिली परंतु यमराजाने गाठलेच, असाच काहीसा प्रकार आत्महत्त्या करणाऱ्या एकाच्या बाबतीत घडला. (person died of severe head injury nashik news)

जेलरोड परिसरातील अपार्टमेंटमध्ये ४७ वर्षीय व्यक्तीने छताच्या फॅनला बेडसीट बांधून गळफास घेतला परंतु, बेडसीट फाटल्याने ते खाली पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यातच त्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

नितीन रामचंद्र निळ (४७, रा. शिल्पस्वामी अपार्टमेंट, करंजकर नगर, जेलरोड, नाशिकरोड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Nashik Crime: चिमुकला कार्यकर्ता ते गुटखा किंग; पोलीस अधीक्षकांनी दिले सखोल तपासाचे आदेश

निळ यांनी शुक्रवारी (ता. ३०) सकाळी अकरा वाजेपूर्वी राहत्या घरात गळफास घेण्यासाठी बेडसीटने फॅनला बांधून गळफास घेतला.

परंतु बेडसीट फाटल्याने ते खाली पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यु झाला. नीळ हे घरात एकटेच राहत असून, त्यांना मद्याचे व्यसन होते. याप्रकरणी उपनगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, हवालदार शेजवळ हे तपास करीत आहेत.

Death News
Nashik News : सुदर्शन दातीर यांच्यावर नाशिकमध्ये अंत्यसंस्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.