Nandurbar News: वैयक्तिक लाभ योजनेचे अडले घोडे! धडगावात योजनेस 7 वर्षांपासून उशीर

Youth Congress taluka president Popat Vasave while giving statement to group development officers
Youth Congress taluka president Popat Vasave while giving statement to group development officersesakal
Updated on

Nandurbar News : सात वर्षांपूर्वी धडगाव तालुक्यात राबविण्यात आलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची रक्कम अद्याप लाभार्थ्यांना देण्यात आली नाही.

त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करीत नेमके योजनेचे घोडे अडकले कुठे, असा सवालही लाभार्थ्यांकडून केला जात आहे.

ही प्रलंबित रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसने गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. (Personal Benefit Scheme 7 years delay in scheme in Dhadgaon Nandurbar News)

धडगाव तालुक्याच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. परंतु बहुतांश योजनांची वेळेवर पूर्तताच होत नाही. त्यामुळे हा तालुका विकासाऐवजी अधोगतीच्या दिशेनेच जात आहे. शासनाच्या अशा योजनांमध्ये २०१६-१७ मध्ये राबविण्यात आलेल्या, परंतु अद्याप रक्कम मिळण्याच्या प्रतीक्षेतील योजनांचाही समावेश आहे.

ही रक्कम मिळवून देण्यासाठी धडगाव तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पोपटा वसावे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्या वेळी तालुक्यात इंदिरा आवास घरकुल योजना, शबरी आवास घरकुल योजना, सिंचन विहिरी, गायगोठा यांसह अन्य योजना राबविण्यात आल्या.

परंतु लाभार्थ्यांना त्याची रक्कम अद्याप देण्यात आली नाही, असे म्हणत लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे पूर्ण केली असली तरी अखेरच्या टप्प्यात मिळणारे अनुदान त्यांना मिळाले नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

गरिबीशी दोन हात करणाऱ्या तालुक्यातील लाभार्थ्यांना तातडीने लाभाची रक्कम मिळवून देण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचित करावे अशी मागणी पोपटा वसावे यांनी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Youth Congress taluka president Popat Vasave while giving statement to group development officers
Tomato Crop: बागलाणमध्ये गावोगावी निषेधाचे बॅनर; शेतकरी संघटनेकडून नाफेडतर्फे टोमॅटो खरेदीचा निषेध अन टीकाही

कर्मचाऱ्यांची वेळ मारून नेणारी भूमिका

घरकुल अनुदानासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे वेळोवेळी विचारणा केल्यास लाभार्थ्यांची नावे लाल यादीत आहे, असे सांगून वेळ मारून नेत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार ग्रामपंचायतींकडून संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून दिली, तरीही घरकुलाच्या अनुदानाबाबत कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जात आहे.

"वर्षभरात निधी परत जाणाऱ्या शासकीय कार्यपद्धतीत सात-सात वर्षे योजनेचा लाभ मिळत नाही, ही बाब धडगाव तालुक्याच्या नशिबी आलेले पापच आहे. जे लाभार्थी व प्रशासनासाठी शोकांतिका ठरते."- पोपट वसावे, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी, धडगाव

Youth Congress taluka president Popat Vasave while giving statement to group development officers
Nashik: डॉ. कोतवाल दांपत्याने फुलविले नंदिनीचे जीवनगीत! मानसकन्येचा मुलीसारखा सांभाळ करीत दिला जीवनाला आकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.