Pest Control Contract in Dispute : अधिकारी- ठेकेदारांच्या विश्रामगृहावरील भेटीने संशयाचे वर्तुळ

Government Rest House
Government Rest Houseesakal
Updated on

नाशिक : शहरात औषध व धूर फवारणी करण्यासाठीच्या पेस्ट कंट्रोलच्या वाढीव रकमेवरून संशय व्यक्त केला जात असताना आता पेस्ट कंट्रोलची संबंधित अधिकारी व ठेकेदारांची शासकीय विश्रामगृहावर झालेली भेट अधिक संशय निर्माण करणारे ठरत आहे.

महापालिकेकडून संपूर्ण शहरात धूळ व औषध फवारणी केली जाते. त्यासाठी दोन ते तीन वर्षाचा पेस्ट कंट्रोलचा ठेका दिला जातो. सध्या सुरू असलेल्या ठेक्याची मुदत संपुष्टात आली असतानादेखील निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याचे तसेच न्यायालयीन प्रकरणाचा आधार घेत सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. वास्तविक पूर्वीचा ठेका १८ कोटी रुपयांचा असताना नवीन ठेक्याची किंमत ४६ कोटी रुपयांवर पोचविण्यात आली. डिझेल दरवाढीचे कारण दिले गेले.

त्यानंतर सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. न्यायालयातून काही प्रमाणात दिलासा मिळाल्यानंतर माजी आयुक्त रमेश पवार यांनी पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात करण्यात आलेल्या अटी व शर्तीसह अनावश्यक खर्चात कपात करून ते ३३ कोटी रुपयांची सुधारित निविदा काढली. निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या काही कंपन्यांना पात्र ठरविण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचा संशय व्यक्त होत असताना त्यातच रविवार सार्वजनिक सुटीचा दिवस हा या ठेक्यात संशय अधिक गडद करणारा ठरला.

Government Rest House
Hair Transplant Failure : केस प्रत्यारोपण फेल का होते?; जाणुन घ्या

शासकीय विश्रामगृहावर पेस्ट कंट्रोलशी संबंधित काही ठेकेदार व अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम व मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके फाइल हाताळताना आढळून आल्याचे शासकीय विश्रामगृहावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. संबंधित ठेकेदार हा अधिकाऱ्यांना त्याच्या वाहनातून घेऊन गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. दरम्यान, या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महापालिकेच्या फाइल बाहेर गेल्यावर जाब विचारला आहे.

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

सदरचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने अधिकाऱ्यांची धांदल उडाली आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांनी संबंधित व्यक्ती ठेकेदार होता हे मला माहीत नसल्याचे उत्तर दिले, तर तर मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. त्र्यंबके यांनी अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांनी शासकीय विश्रामगृहावर फाइल घेऊन बोलावल्याने मी तिथे गेलो. परंतु, येथे ठेकेदार माझ्या आधीच उपस्थित होता. या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले.

Government Rest House
Heavy Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे येवल्यात 9 हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.