YCMOU Bharti News: नातेवाइकांना नोकरी देतात, मग आम्‍हालापण द्या..! मुक्‍त विद्यापीठातील भरती वादात

YCMOU
YCMOUesakal
Updated on

YCMOU Bharti News: यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठात नोव्‍हेंबर २०२१ मध्ये १७ कर्मचाऱ्यांच्‍या नियुक्‍तीचे प्रकरण वादात सापडले आहे. सेवाज्‍येष्ठता डावलून व बेकायदेशीर पद्धतीने सहाय्यक पदाच्‍या नियुक्‍त्‍या केल्‍या असल्‍याचे सांगताना भरतीपासून वंचित राहिलेल्‍या उमेदवारांनी उच्च न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे.

विद्यापीठातील काहींकडून नियम डावलून नातेवाइकांना नोकरी दिली असून, त्‍यांच्‍याप्रमाणे आम्‍हालाही सेवेत सामावून घ्यावे, अशी उमेदवारांची मागणी आहे. (Petition From Disadvantaged Candidates for ycmou bharti nashik news)

याचिकाकर्ते संदीप थेटे व इतर आठ उमेदवारांनी नुकताच विद्यापीठाचे कुलपती तथा राज्‍यपालांना निवेदन पाठवत या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या निवेदनात नमूद केल्‍यानुसार मुक्‍त विद्यापीठ कायद्यातील कलम २९ (१) व (२) अन्‍वये शासनाच्‍या पूर्वपरवानगीशिवाय नव्‍याने पदे निर्मिती व पदभरती करता येत नाही. अशी पदे निर्मिती व भरती करताना वित्त समितीच्‍या शिफारशीनुसार आणि व्‍यवस्‍थापन मंडळाच्‍या मान्‍यतेने शासनाला प्रस्‍ताव सादर करावा लागतो.

परंतु २०२१ मध्ये विद्यापीठ आस्‍थापनेवरील सहाय्यकांची एकूण ४५ पदे निर्माण करताना विहित कार्यपद्धतीचा अवलंब केला नाही. शासनास कुठल्‍याही स्‍वरूपातील प्रस्‍ताव न पाठवता नियमबाह्य पद्धतीने पदे निर्माण केली गेली व त्‍यापैकी १७ पदांवर कर्मचारी थेट सेवेत सामावून घेतले. दुसरीकडे पात्र असलेल्‍या नऊ कर्मचाऱ्यांना डावलले गेले.

यासंदर्भात संबंधित उमेदवारांनी मुंबई उच्च न्‍यायालयात याचिका दाखल केली असून, त्‍यामुळे परीविक्षा कालावधीतील त्‍या १७ कर्मचाऱ्यांच्‍या पुढील नियुक्‍ती आदेशाला स्‍थगिती देण्याची मागणी केली आहे.

YCMOU
YCMOU Convocation News: ‘मुक्‍त’च्‍या ‘दीक्षान्त’साठी नाव पडताळणीचे आवाहन; या संकेतस्थळावर करा पडताळणी

यापूर्वी २००४ मध्ये शिफारस समिती गठित करून त्‍याआधारे भरती करण्यात आली होती. याचा संदर्भ घेताना विद्यापीठाने भरती करून घ्यावी, अशी वंचित उमेदवारांची मागणी आहे.

‘ते’ उमेदवार अपात्र

सर्व नियम डावलून केवळ विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आहेत म्‍हणून १७ कर्मचाऱ्यांना नियुक्‍त्‍या दिल्‍या आहेत. यापैकी आठ उमेदवारांकडे एकतर टंकलेखन कौशल्‍ये किंवा संगणक कौशल्‍ये नाहीत तरीदेखील सोयिस्‍कररीत्‍या अपात्र उमेदवारांना नियुक्‍त्‍या दिल्‍या. दुसरीकडे पात्रता असूनही वंचित ठेवल्‍याचे याचिकाकर्त्या नऊ उमेदवारांचे म्हणणे आहे. सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचे पर्याय उपलब्‍ध असून, अन्‍याय झाल्‍यास त्‍याविरोधात लढण्याची तयारी या याचिकाकर्त्यांनी दर्शविली आहे.

"आम्‍हाला संबंधित १७ लोकांना बेरोजगार करायचे नाही. परंतु आमची पात्रता असतानाही आम्‍हाला डावलून झालेल्या भरतीला आमचा विरोध आहे. माझ्यासह सर्व नऊ उमेदवारांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी असून, यासंदर्भात प्रसंगी कायदेशीर लढा देऊ." - संदीप थेटे, याचिकाकर्ते

YCMOU
Nashik News: महापालिका जलकुंभास गळती; शेकडो लिटर पाणी वाया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.