प्रभाग क्रमांक 44 बाबत उच्च न्यायालयात याचिका

amit jadhav & trambak Kombade
amit jadhav & trambak Kombadeesakal
Updated on

इंदिरानगर (जि. नाशिक) : पिंपळगाव खांब हे गाव एकाच प्रभागात असावे, यासाठी शिवसंग्रामचे महानगरप्रमुख अमित जाधव आणि शिवसेनेचे (Shiv Sena) विभागप्रमुख त्र्यंबक कोंबडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत राज्य निवडणूक आयोग (State Election Commission), महाराष्ट्र नगर विकास विभाग व नाशिक महापालिका (NMC) या तिघांच्या विरोधात पुर्नयाचिका (रिट पिटीशन) दाखल केली आहे. (Petition to High Court regarding Ward No 44 Nashik News)

३ फेब्रुवारीला जाधव व कोंबडे यांनी महापालिकेत हरकत घेतली. यात काही निर्णय झाला नाही म्हणून ८ मार्चला मुंबई येथे राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन व्यथा मांडली. परंतु, त्यांनीही काही उत्तर न दिल्याने ६ जूनला पुन्हा राज्य निवडणूक आयोगाला पत्र व्यवहार केला. आता त्यांनी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले आहे .जाधव आणि कोंबडे यांच्या मते पिंपळगाव खांबचे प्रभाग ४३ व ४४ मध्ये झालेले विभाजन व ४४ मध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण हे दोन्ही अतिशय गंभीर विषय आहेत.

amit jadhav & trambak Kombade
SSC Result : जिल्ह्याचा निकाल 96.37 टक्‍के

पिंपळगाव गाव खांबच्या विभाजनामुळे गावचा विकास खुंटला, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासकीय प्रभा रचना नियमावली बघता गावठाण हे ४३ मध्ये आहे. अनेक नियमांचा कुठलाही विचार न करता या प्रभागाची बांधणी केली आहे. पिंपळगाव खांब हे गाव प्रभाग ४३ व ४४ मध्ये विभाजितच नाही तर दोन विभागात म्हणजे ४३ नाशिक रोड विभाग व ४४ सिडको विभाग या दोन विभागात विभाजित केले आहे. तसेच, कोंबडे यांनी प्रभाग ४४ मध्ये पडलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण कोणत्या आधारावर पडले यासाठी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. पुढील सुनावणी येत्या २७ जूनला मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.

amit jadhav & trambak Kombade
22 वर्षांच्या गॅप नंतर दहावी उत्तीर्ण; आई व मुलाने सोबत मिळविले यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.