पिंपळगाव शहरातील 13 पैकी 7 पेट्रोलपंप ड्राय

Petrol out of stock board
Petrol out of stock boardesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : इंधन कंपन्यांनी (Fuel Company) २०१७ पासून पंपडिलर्सचे कमिशन न वाढविल्याने त्या विरोधात शहरातील पंप चालकांनी कंपन्याकडून पेट्रोल-डिझेल (Petrol diesel) खरेदी केली नाही. एका दिवसाच्या त्या संपामुळे काहीशी टंचाई निर्माण झाली असताना इंधन पुरवठा (Fuel Supply) करणाऱ्या कंपन्यानी आज पुरवठाच केला नाही. त्यामुळे पिंपळगाव शहरातील तेरापैकी आठ पंपावरील इंधन संपले. त्यामुळे इंधन नसलेल्या ठिकाणी शिल्लक नसल्याचा फलक तर आहे तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा अशी स्थिती आज दिवसभर होती. यात नागरिकांची विनाकारण मोठी फरपट झाली. (Petrol Crisis in Pimpalgaon city Nashik News)

Petrol out of stock board
शालेय साहित्य खरेदीची तयारी : किंमती 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्या

पिंपळगाव शहरातील तेरा पेट्रोलपंपामधून दररोज ५० हजार लिटर डिझेल तर ३० हजार लिटर पेट्रोलची विक्री होते. मनमाडच्या पाणेवाडी येथून एचपीसीएल, इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियअम कंपन्या पेट्रोलपंपाना पुरवठा करतात. मंगळवारी पेट्रोलपंप धारकांनी कमिशन वाढवित नाही म्हणून इंधन खरेदी केले नाही. त्यांची झळ असतानाच आज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी दरवाढ करण्यासाठी कृत्रिम टंचाई करत पुरवठा आज केला नाही. त्यामुळे शहरातील अर्ध्याहून अधिक पंपावर नो स्टॉकचा फलक झळकला. एरवी गजबजलेले पंपावर शुकशुकाट होता. इंधन शिल्लक असलेल्या ठिकाणी पंपावर लांबचलांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. भरउन्हात इंधन शोधण्यासाठी वाहनधारकांची धावपळ सुरू होती.

Petrol out of stock board
Nashik : तरुणांमध्ये विराट कटची क्रेझ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.