सटाणा (जि. नाशिक) : शहर व तालुक्यात सध्या पेट्रोलचा मोठा तुटवडा (Petrol Scarcity) निर्माण झाला असून, यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. शहरातील मोजक्याच पेट्रोल पंपांवर (Petrol Pump) पेट्रोल मिळत असल्याने या पंपांवर वाहनधारकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. तर काही पेट्रोलपंपावर पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel) शिल्लक नाही, त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, वाहने रस्त्यावर आणणे कठीण झाले आहे. इंधनाची दरवाढ (Fuel Price hike) व्हावी या उद्देशाने कंपन्यांतर्फे ही कृत्रिम टंचाई निर्माण केला जात असल्याची चर्चा आहे. यामुळे अनेक पेट्रोल पंपावर ‘नो स्टॉक’चा बोर्डही लावला जात आहे. (Petrol shortage in Satana taluka Long queues of vehicles Nashik News)
शहर व तालुक्यातील जवळपास सर्वच पेट्रोलपंपांवर आज पेट्रोल टंचाई जाणवत असल्याने पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ज्या पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे, त्या पंपावर वाहनचालक गर्दी करत होते. अनेक पंपावर वाहनचालकांची गर्दी रात्रीपर्यंतही कायम होती. याबाबत पंपचालकांना विचारले असता पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडूनच पुरवठा सुरळीत नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या लग्नसराई सुरू आहे. दुचाकी व कारसाठी पेट्रोल लागते. मात्र पेट्रोलची टंचाई असल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पेट्रोल मिळणे अत्यंत गरजेचे आहे. दोन दिवस पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोल ९.५० रुपये तर डिझेल सात रुपयांनी प्रतिलिटरमागे स्वस्त केले. याचा थेट फायदा ग्राहकांना होणार असला तरी पेट्रोलियम कंपन्यांचे मात्र लिटरमागे १५ ते २५ रुपयांचे नुकसान होत आहे. याचमुळे कंपन्यांनी इंधन पुरवठ्यासाठी हात आखडता घेतला असून इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याची सध्या चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.