PFI Case : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यालय पोलिसांकडून सील

PFI News
PFI Newsesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : दहशतवादी कारवायांतील सहभाग व रसद पुरवठ्याचा संशय असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आल्यानंतर गुरुवारी (ता. २९) शहरातील टेन्शन चौक भागातील पीएफआयच्या कार्यालयाला पोलिसांनी सील ठोकले. (PFI office sealed by police Nashik Latest Marathi News)

PFI News
Traffic Crisis : वाहनाचालकांना पट्ट्याचा अन् पोलिसांना ‘ठोस’ कारवाईचा विसर

तत्पूर्वी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या उपस्थितीत अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कार्यालयाची तपासणी करत कागदपत्र, प्रचार साहित्य जप्त केले. देशविघातक प्रचार व जातीय तेढ, समाजविघातक कारवाया यांसह विविध आरोपांवरून शहरातील पीएफआयच्या प्रमुखासह तिघा सदस्यांना एनआयए व स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अटक केली आहे.

कार्यालयाला सील ठोकताना जप्त केलेले दस्तऐवज, कागदपत्रांचे, वस्तूंचे चित्रीकरण करण्यात आले. पोलिस निरीक्षक सुरेश घुसर, अशोक रत्नपारखी व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. पीएफआयच्या अन्य सदस्यांच्या हालचालींवर स्थानिक पोलिस लक्ष ठेवून आहेत.

PFI News
1 Station 1 Product Scheme : नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर पैठणी स्टॉल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.