Nashik News : ऐंशीच्या दशकापर्यंत घराघरांतील सर्वच खोल्यांत देवदेवतांसह पूर्वजांचे फोटो मोठ्या प्रमाणावर लावले जात.
मुख्य हॉलमध्ये तर एकसारख्या फोटोची रांगच दिसून येई. मात्र आता अनेकांना आपल्या पूर्वजांसह देवदेवतांच्या तसबिरीही नकोशा झाल्याने त्या चक्क सार्वजनिक ठिकाणी टाकून दिल्या जात आहेत.(Photos and idols are throw in public places at goda ghat nashik news)
कधीकाळी घराघरांत ज्येष्ठ, पूर्वजांच्या फोटोसह देवदेवतांचे फोटो मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतं. त्यासाठी फोटोच्या खालील बाजूस खास बॉटमपट्टी लावून सर्व फोटो एकाच आकाराचे ठेवण्याकडे कल असे. राजे राजवाडे जसे आपल्या पूर्वजांच्या स्मृती जपत तशा स्मृती घरोघर जपल्या जात असतं.
फोटोच्या खालील बाजूस संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्मतारीख, मृत्यू झाला असल्यास ती तारीख आवर्जून टाकली जात असे. विशेषतः जुन्या वाड्यांमध्ये हे चित्र प्रकर्षाने आढळून येई. कालौघात अनेक कुटुंबे विभक्त झाली.
त्यामुळे जुन्या ऐसपैस वाड्यांची जागा सोसायटी, अपार्टमेंटने घेतली, अन जागेबरोबरच मानवी मनाचा संकोच सुरू झाला. त्यामुळे अशा ज्येष्ठांच्या फोटोंना अडगळीची जागा मिळाली. अशा अनेक मूर्ती अन फोटो गोदाघाटावर मोठ्या प्रमाणावर टाकल्या जात आहेत.
आजोबा, पणजोबा नकोच
घरांचा आकार स्वेअर फुटामध्ये मोजला जाऊ लागला अन माणसांची मनेही संकुचित होऊ लागली. वन, टू बीएचकेच्या काळात अनेकांना आजोबांचीच नव्हे तर चक्क आईवडिलांचीही अडचण होऊ लागली. ‘हम दो हमारे दो’ च्या काळात निर्जीव फोटो सोडाच आईवडीलही नकोसे झाले. कधीकाळी तीन चार पिढ्या एकत्र कुटुंबपद्धती अनुभवलेल्यांची अडचण झाली.
मात्र त्याच्याशी काहीही सोयरसुतक नसलेल्या या पिढीने देवता, पूर्वजांच्या फोटोफ्रेमएवजी महागड्या शोपीसला पसंती दिल्याचे दिसून येते. याही स्थितीत आजही अनेकजण ज्येष्ठांचा सन्मान करतात, परंतु त्यांची संख्या कमी आहे. नको असलेले जुने देवदेवतांचे फोटो, देव्हारा, पूर्वजांचे फोटो, पूजेचे साहित्य गोदाघाटावर टाकले जाते.
अहिल्यादेवी होळकर पूल, गाडगे महाराज पूल, तपोवन आदी भागात असे टाकून दिलेले फोटो मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. याशिवाय शहराबाहेरील अनेक झाडांजवळीही असे फोटो, देवदेवतांच्या मूर्ती टाकण्याकडे कल वाढला आहे.
''खरेतर ज्ञानसंपन्न पूर्वज आपली संपत्ती आहे. परंतु पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी मोठे कष्ट घेणाऱ्या पूर्वजांसह देवदेवतांचे फोटो नदीपात्रात टाकल्याने नदीच्या प्रदूषणाबरोबरच पूर्वजांचाही नकळत अवमान होतो.''- निशिकांत पगारे, पर्यावरणवादी कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.