Physical Fitness : बदलती जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, मानसिक ताणतणाव आणि पुरेशी झोप नसणे यासह अनेक कारणांनी शारीरिक सुदृढतेकडे दुर्लक्ष होते. परिणामी, तारुण्यातही असाध्य असे विकार जडतात.
लठ्ठपणा, उत्साह नसणे, नैराश्य यासह हृदयविकारापासून ते शारीरिक अनेक व्याधी कमी वयात होत असल्याचे आपल्याच आसपास दिसून येत आहे. यामागे शारीरिक सुदृढतेकडे होणारे दुर्लक्ष हेच एकमेव मूलभूत कारण आहे.
या साऱ्या व्याधींवर मात करण्यासाठी अनेक सकारात्मक आणि शारीरिक व्यायामाशी निगडित उपाय करताना दिसत आहेत. प्रामुख्याने यात ‘स्वत:साठी फक्त एक तास...’ याच संकल्पनेभोवतीच सारे उपाय असून, यामुळे अनेकांना त्यांना जडलेल्या व्याधींपासून सुटका झाल्याची अनुभूती होताना दिसत आहे.
त्यामुळे समाजात ‘स्वत:साठी फक्त एक तास ...’ ही संकल्पना रूजतानाची सकारात्मक बदल दिसत आहे. (Physical Fitness one hour for yourself many patterns for strong health nashik news)
सध्या प्रत्येकाचा दिनक्रम अत्यंत धकाधकीचा झाला आहे. प्रत्येकजण आपापल्या व्यवसाय, कामात इतका व्यस्त आहे की स्वत:च्या शारीरिक आरोग्याकडेही लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे अत्यंत कमी वयामध्ये डायबेटिस, उच्च वा कमी रक्तदाब, कंबरदुखी, सांधेदुखी, लठ्ठपणा, कर्करोग यासह अनेक असाध्य अशा व्याधी जडत आहेत.
जेव्हा या व्याधी जडल्याचे समोर येते, त्यावेळी त्यावर मात करण्यासाठी औषधोपचारांवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यातून अनेकजण नैराश्याच्या गर्तेत सापडले जातात.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून नवीन नाही, जुन्याच पद्धतींना नव्याने समाजासमोर आणून अशा व्याधींवर यशस्वीरीत्या मात करता येते, असे नवनवीन उपक्रम पद्धती समाजात राबविल्या जात आहेत. या सर्वांच्या मुळाशी एकच साधर्म्य आहे, ते म्हणजे २४ तासांतील फक्त १ तास स्वत:च्या शरीरासाठी काढणे.
याचा अर्थ शारीरिक सुदृढतेसाठी. या एका तासात फक्त कठोर मेहनत घेत व्यायाम करा. वेगात चालणे, धावणे, सायकलिंग करणे, एका तास शरीरातून घाम गाळेपर्यंत व्यायाम करणे यासह आहारातही बदल करावा लागतो. अशाप्रकारे शारीरिक सुदृढतेवर लक्ष केंद्रित करणारे एक ना अनेक उपक्रमांमुळे अनेकांना लाभ होताना दिसत आहे.
दीक्षित डायट पॅटर्न
डॉ. जगन्नाथ दीक्षित डायट पॅटर्न हा गेल्या काही वर्षांत अनेकांना लठ्ठपणा, डायबेटिज् आणि शुगरपासून मुक्त करणारा उपक्रम ठरला आहे. या पॅटर्नच्या मुळाशीही २४ तासात फक्त ४५ मिनिटात वेगात चालणे महत्त्वाचे आहे. तसेच, २४ तासात फक्त दोन वेळा जेवण करावे या दोन मूलभूत तत्त्वावर डॉ. दीक्षित पॅटर्न अवलंबून आहेत. परंतु या पॅटर्न देशभरात लाखोंचे फॉलोअर्स आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वेलनेस पॅटर्न
अलीकडे आहारानिष्ठ आणि शारीरिक व्यायाम याच्याशी निगडित आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी केली जाते. प्रामुख्याने लठ्ठपणामुळे वजन कमी करण्यासाठी या पॅटर्नकडे अनेकजण वळताना दिसत आहेत. या पॅटर्नच्या मुळाशीही किमान एक तासाचा शारीरिक व्यायाम आहे.
याशिवाय काही न्युट्रीशन्स दिले जातात. त्यामुळे शरीराला हवे असलेले प्रोटिन्स त्यामुळे मिळतात. मात्र त्याचवेळी आहाराचे निर्बंध आहेच. परंतु त्याचाही सकारात्मक परिणाम दिसून आल्याने बहुतांशी व्याधीग्रस्त या पॅटर्नला फॉलो करीत आहेत.
केवळ चालणे अयोग्य
भल्या पहाटे जॉगिंग ट्रॅक, रस्त्यालगत चालताना अनेकजण दिसून येतात. परंतु त्यात सातत्य नसणे, अथवा संथपणे चालणे यातून शरीराला कोणताही फायदा होत नाही. ठराविक वेळेत वेगवान चालणे, किमान एक तास सायकलिंग करणे, लठ्ठपणा कमी करायचा असेल तर पोटावर ताण पडेल असे व्यायाम करणे आवश्यक असते.
"चुकीचा आहार, बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे शारीरिक आरोग्य धोक्यात आले आहे. शारीरिक श्रमाऐवजी बैठे काम यामुळेही अनेक व्याधी उद्भवतात. यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:च्या शरीरासाठी किमान एक तास देणे गरजेचे आहे. या एका तासात शारीरिक व्यायाम करावा. धावणे, सायकलिंग केल्याने अनेक शारीरिक व्याधींवर मात करणे शक्य आहे. आहारात बदल करणेही अत्यंत गरजेचे आहे."
- डॉ. प्रतीक भांगरे, मेडिसीन, जिल्हा रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.