Nashik News : कोठरे फाट्यानजीक अनाधिकृत गोमांस घेऊन जाणारा पिकअप पोलीसांच्या ताब्यात

Pickup carrying beef
Pickup carrying beefesakal
Updated on

Nashik News : मालेगावहुन नामपूरच्या दिशेने पिकअप वाहनातून अनाधिकृत गोमांस घेऊन जाणा-या वाहनाला कोठरे (ता.मालेगाव) फाट्यानजीक पकडण्यात गोरक्षकांना यश आले असून वाहनासह दोन संशयितांना वडनेर खाकुर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.

मालेगावहुन पिकअप वाहन (क्र. एमएच १५ ईजी ९४६३) गोमांस नेण्यात येणार असल्याची गुप्त माहिती प्राणी फोडेंशनला मिळाली होती.(Pick up carrying unauthorized beef near Kothare Fati is in police custody Jalgaon Crime News)

त्या अनुषंगाने प्राणी फाऊंडेशनच्या संस्थापक नेहाबेन पटेल यांच्या प्राणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व गोरक्षक शिवप्रतिष्ठान संस्थापक संजय शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार सदर वाहन पोलिसांच्या स्वाधीन करण्यासाठी परिसरातील गोरक्षकांनी ठिकठिकाणी गोरक्षक युवकांना पहारा देत दुपारी साडेबाराच्या सुमारास मालेगावहुन पाठलाग करीत कोठरे फाट्यानजीक पकडण्यात तरुणांना यश आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Pickup carrying beef
CM In Dhule : धुळ्यात 27 नोडल अधिकारी नियुक्त; शासन आपल्या दारी अभियान

वाहनाची तपासणीनंतर गोणीत गोमांस भरलेले आढळून आले. याबाबत सदर तरूणांनी वडनेर खाकूर्डी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली.

वडनेर खाकूर्डी पोलिसांनी सदर वाहन, गोमांस व दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई उशिरापर्यंत सुरूच होती. वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार काय कारवाई करतात याकडे परिसरातील पशुप्रेमींचे लक्ष लागून आहे.

Pickup carrying beef
Nashik News : गळफास घेताना बेडसीट फाटले पण.... असा झाला मृत्यु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()