Nashik Road Note Press: नोट प्रेस भिंतीवर नोटांची चित्रे ठरताहेत लक्षवेधी!

Illustrations of banknotes drawn on the wall of the press.
Illustrations of banknotes drawn on the wall of the press.esakal
Updated on

Nashik Road Note Press : देशाला चलनी नोटांचा पुरवठा करणाऱ्या नाशिक रोड येथील करन्सी नोट प्रेसच्या बाहेरील भिंतीवर सध्या जुन्या नोटांची चित्रे काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

नोटांची ही चित्रे सध्या लक्षवेधी ठरत असून, नागरिकांना या चित्रांच्या माध्यमातून नोटांचा इतिहास समजत आहे. (pictures of notes on walls of Nashik Road Note Press eye catching nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Illustrations of banknotes drawn on the wall of the press.
Nashik: 1 अधिकाऱ्यावर 7 बिटांचा अतिरिक्त पदभार! बागलाण तालुक्यात शिक्षकांना वर्ग सांभाळून कारभार पाहण्याची वेळ

संपूर्ण भारताला चलनी नोटांचा पुरवठा करणारी ब्रिटिशकालीन प्रेस नाशिक रोडला आहे. प्रेसच्या बाहेरील भिंतीवर सध्या नोटांची चित्रे रेखाटली जात आहेत. हे काम एका एजन्सीला देण्यात आले असून, जुन्या एक रुपयाच्या नोटेपासून तर पन्नास रुपयांपर्यंत नोटांचा बदलता प्रवास या रेखाटनांतून अधोरेखित केला जात आहे.

याशिवाय नोटा वापरणारे सामाजिक आयडॉल म्हणून शेतकरी, शाळकरी मुले, नागरिकांची चित्रेही रेखाटली जात आहेत. त्यामुळे या चित्रांना एक प्रकारे सामाजिक आशय दिला जात आहे. नोटांचे स्वरूप कसे बदलले, याचा रंजक लेखाजोखा या चित्रांच्या माध्यमातून समजतो.

एक रुपयापासून तर पन्नास रुपयांपर्यंतच्या नोटांची चित्रे या भिंतीवर रेखाटली जात असल्यामुळे चित्रकलेचे चाहते त्याचे निरीक्षण करीत आहेत. यामुळे प्रेसच्या सौंदर्यातही वाढ होत आहे. परंतु, पर्यटकांच्या दृष्टीने एक अभ्यास दौरा म्हणूनही ही रेखाटने सध्या लक्षवेधी ठरत आहेत.

Illustrations of banknotes drawn on the wall of the press.
Dada Bhuse : महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी : दादा भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()