Election : पिंपळगाव बसवंतमध्ये चिन्ह वाटपाच्या वादावर पडदा; बनकर गटाला छत्री तर कदम गटाला बस निशाणी

A crowd of Bunkar-Kadam supporters during the distribution of symbols in the Bazar Samiti elections.
A crowd of Bunkar-Kadam supporters during the distribution of symbols in the Bazar Samiti elections.esakal
Updated on

Election : पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार बनकर व माजी आमदार कदम गटातील राजकारण आज चिन्ह वाटपातही कायम राहिले. माजी आमदार कदम यांच्या गटाने सांघिक चिन्हासाठी निर्धारित वेळेत अर्ज दाखल केला नसल्याच्या मुद्द्यावरून आमदार बनकर गटाने आक्षेप घेतला.

उमेदवारांना एकच चिन्ह देण्याबाबत हरकत नोंदविली. यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण होऊन निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन मागविले.

अखेर या वादावर सायंकाळी पडदा पडून आमदार बनकर यांच्या गटाला छत्री तर माजी आमदार कदम यांच्या गटाला एसटी बस निशाणी मिळाली. (Pimpalgaon Baswant on controversy of distribution of symbols Umbrellas for Bunkar group and bus signs for Kadam group nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

A crowd of Bunkar-Kadam supporters during the distribution of symbols in the Bazar Samiti elections.
Market Committee Election : न्यायालयाची लढाई जिंकलो, रणांगणही जिंकू : डॉ. सतीश पाटील

सांघिक एक चिन्ह हवे असेल तर शुक्रवारी (ता.२१) अकरापर्यंत त्या पॅनलच्या उमेदवारांनी एकत्रित अर्ज करण्याची मुदत होती. आमदार बनकर गटाच्या शेतकरी विकास पॅनलने सकाळी साडेदहाला अर्ज दाखल करून छत्री निशाणीची मागणी केली.

पण माजी आमदार कदम यांच्या गटाकडून अकरापर्यंत अर्ज आल्यानंतर आमदार बनकर गटाने आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविले.

त्यावर आयोगाकडून वेळेच्या बंधनाऐवजी नैसर्गिक न्यायाने सांघिक एक चिन्ह वाटप करण्याची सूचना केली. त्यामुळे माजी आमदार कदम गटाला दिलासा मिळाला. माजी आमदार अनिल कदम, सरपंच भास्करराव बनकर तर आमदार बनकर गटाकडून प्रमोद कुटे यांनी बाजू मांडली.

A crowd of Bunkar-Kadam supporters during the distribution of symbols in the Bazar Samiti elections.
Market Committee Election : राष्ट्रवादी-शिवसेनेला कपबशी तर सर्वपक्षीय पॅनलला छत्री; उमेदवारांना चिन्हांचे वाटप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.