पिंपळगाव बसवंत : वाढती लोकसंख्या देशापुढील सर्वाधिक मोठी समस्या आहे. लोकसंख्येला मर्यादित ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रभावी मार्ग आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करते. कुटुंब नियोजनासाठी लाभार्थ्यांना प्रवृत्त करणे कसरतीचे काम असते.
हे दिव्य पिंपळगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लिलाया पार केले आहे. कुटुंब नियोजनाचे दिलेल्या उद्दिष्ट वेळेपूर्वी साध्य करून ४३२ शस्त्रक्रिया (१२० टक्के) करण्याची किमया साधली आहे.
यात एका पुरुषाने नसबंदी केली आहे, तर दहा महिलांनी मुलांचा हट्ट न धरता दोन मुलींवर शस्त्रक्रिया करून मुलगा-मुलगी समान असल्याचा संदेश दिला आहे. (Pimpalgaon Health Center tops in family planning surgery nashik news)
नागरिकांचे आरोग्य अबाधीत ठेवण्याबरोबरच लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाला कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट दिले जाते. आनंदीबाई जोशी पुरस्कार विजेत्या पिंपळगाव आरोग्य केंद्राचा याबाबत हातखंडा आहे.
नियोजित उद्दिष्ट पूर्ण करण्याची गेल्या १५ वर्षांची परंपरा यंदाही पिंपळगाव आरोग्य केंद्राने कायम राखली आहे. यंदा कुटुंब नियोजनासाठी ३९३ चे उद्दिष्ट दिले होते.
डॉ. कदम, डॉ. योगेश धनवटे, आरोग्य सहाय्यक शरद तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी एप्रिलपासूनच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी प्रजननक्षम जोडप्याच्या कुटुंबाच्या भेटी घेऊन जनजागृती केली.
लाभार्थ्याच्या सोयीनुसार अगदी रविवारीही शस्त्रक्रिया शिबिर घेऊन तत्पर सेवाचा प्रत्यय दिला.
डिसेंबरमध्ये उद्दिष्टपूर्ती
वर्षभराचे उद्दिष्ट नऊ महिन्यांत पूर्ण करत पिंपळगांव आरोग्य केंद्र नाशिक जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. ३९३ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट डिसेंबर अखेर साध्य केले. उद्दिष्ट पूर्ण झाले, म्हणून न थांबता लोकसंख्येला आळा घालण्याचे हे कार्य सुरूच ठेवले.
आतापर्यंत ४३२ शस्त्रक्रिया झाल्या असून, उद्दिष्टाच्या तुलनेत १२० टक्के कामाची नोंद झाली आहे. यात १० महिलांनी दोन मुलींवर शस्त्रक्रिया करून ‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’, या ओळी प्रत्यक्षात आणल्या आहेत.
शस्त्रक्रियेचे उद्दिष्टपूर्तीबद्दल पिंपळगाव आरोग्य केंद्राच्या कामकाजाचे नाशिक जिल्ह्याच्या आढावा बैठकीत जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी कौतुक केले.
प्रसूतिला महिलांची पसंती
तीन तालुक्यांचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या पिंपळगाव आरोग्य केंद्र सेवा देण्यात तत्पर आहे. त्यामुळे महिलांची प्रसूतिला पिंपळगाव आरोग्य केंद्राला पसंती असते.
गेल्या दहा महिन्यांत तब्बल तीनशे प्रसूती झाल्या आहेत. म्हणजे दर दिवशी एक प्रसूती पिंपळगाव आरोग्य केंद्रात होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.