Nashik News : अतिक्रमणाने गिळलेल्या शिवरस्त्याने घेतला मोकळा श्वास

The road from Pimpalgaon Lep to Dahegaon Patoda Shivrasta has been opened.
The road from Pimpalgaon Lep to Dahegaon Patoda Shivrasta has been opened.esakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : अनेक वर्षे दिसेनासा झालेला व बंद असलेला पिंपळगाव लेप ते दहेगाव पाटोदा शिवरस्ता महसूल विभाग व तहसीलदार प्रमोद हिलेंच्या पुढाकारातुन खुला झाला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन समजोता करत हा रस्ता खुला करण्यात आला आहे.

याठिकाणी सुमारे २०० ते २५० मीटर अंतरावरील अतिक्रमण काढण्यात येऊन १५ फुटांचा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. (Pimpalgaon Lep to Dahegaon Patoda road open nashik news)

शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या भरभराटीसाठी ग्रामीण भागात शेतरस्ते, शिवरस्ते मोकळे असणे आवश्यक असते. पण अनेकदा हे रस्ते अतिक्रमण करून नाहीसे केले जातात. असाच प्रकार पिंपळगाव लेप येथील गट नंबर ३०७ व दहेगाव पाटोदा येथील गट नंबर ४९ यांच्यामधील शिवरस्त्याबाबत झाला होता.

या शिवरस्त्यावर दोन्ही बाजूने शेततळे बांधल्याने शिवरस्ता गायब झाला होता. पिंपळगाव लेप ते दहेगाव पाटोदा हा शिवरस्ता अडवला गेल्याची तक्रार तहसीलदार प्रमोद हिले यांच्याकडे जून २०२२ मध्ये दाखल झाली होती. प्रत्यक्ष तीनवेळा स्थळनिरीक्षण झाले. अनेकदा बैठका झाल्या, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्यात समझोता घडवून आणण्याचे प्रयत्न केले गेले; पण वाद मिटत नव्हता.

त्यामुळे वादग्रस्त गटांची मोजणी करून शिवरस्त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सर्वानुमते ठरले. डिसेंबर व जानेवारीत दोन्ही गटांची मोजणी झाली. मोजणीनंतर गटांच्या हद्दी निश्चित झाल्याने शिवरस्त्याचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

The road from Pimpalgaon Lep to Dahegaon Patoda Shivrasta has been opened.
Tejasswi Karan House: तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचे दुबईतील घर पाहून व्हाल चकित

प्रांताधिकारी ज्योती कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रमोद हिले, मंडळ अधिकारी चेतन चंदावार, प्रदीप मोटे, तलाठी पूजा दिंडोरकर, पांडुरंग बोडखे, कोतवाल आहेर, अर्चना दौंडे यांनी हा शिवरस्ता मोकळा केला.

यासाठी अंबादास काळे यांनी जेसीबी उपलब्ध करून दिले. त्याद्वारे अतिक्रमण काढून १५ फुटांचा कच्चा रस्ता तयार करण्यात आला. हा शिवरस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनतून बळकटीकरण करण्याचे नियोजन आहे.

या कामात तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, मोजणी विभागाचे सोमनाथ सानप, शशिकांत शिंदे, शशिकांत केंद्रे, शिरसगाव लौकीचे सरपंच विजय इंगळे यांच्यासह दोन्ही बाजूचे शेतकरी बाबूराव काळे, एकनाथ काळे, अंबादास काळे, नानाभाऊ काळे, पुष्पा व्हालगडे, सुनील जाधव, गोकुळ जाधव, मंदाबाई जाधव, गायत्री जाधव, अशोक बुल्हे, यमुनाबाई वाघ यांनी सहकार्य केले.

The road from Pimpalgaon Lep to Dahegaon Patoda Shivrasta has been opened.
Dhule Crime News : साक्री शहरात सव्वा लाखाचे दागिने लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.