पिंपळगाव बाजार समितीत 45 हजार क्विंटल कांद्याची आवक; 4 कोटींची उलाढाल

पिंपळगाव बाजार समितीत कांद्याची बंपर आवक नोंदविली गेली
Pimpalgaon Market committee
Pimpalgaon Market committee Sakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगाव बाजार समितीत कांद्याची बंपर आवक नोंदविली गेली. तब्बल ४५ हजार कांदा जिल्ह्याभरातून विक्रीसाठी आला. पिंपळगाव बाजार समितीचे आवार उन्हाळ व लाल कांद्याने गजबजून गेले. आवक वाढून बाजारभाव स्थिर राहिल्याने चार कोटींची उलाढाल झाली. (Pimpalgaon Market committee receives 45 quintals of onions)

जिल्ह्यातील काही बाजार समित्याचे कामकाज कोरोनामुळे ठप्प आहे. पिंपळगाव बाजार समिती शहरापासून दोन किमी अंतरावर असल्याने कोरोना संबंधीचे नियमांचे पालन करून येथे लिलाव सुरू आहे. एरवीही शेतकर्यांच्या पहिली पसंत असलेल्या पिंपळगाव बाजार समितीत चोहीकडे कांदाच कांदा, अशी स्थिती होती. कळवण, सटाणा, मालेगाव, चांदवड, येवला आदीसह जिल्हाभरात कांदा पिंपळगाव बाजार समितीत विक्रीसाठी आला. तब्बल दोन हजार १२० वाहनातून सुमारे ४५ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला.

Pimpalgaon Market committee
नाशिकमध्ये सभागृहनेता सतीश सोनवणे यांच्या कार्यालयाची तोडफोड

बंपर आवक होऊनही कांद्याची दर स्थिर राहिले. लाल कांद्याल किमान ४००, कमाल ९०१, सरासरी ८०० तर, उन्हाळ कांद्याला सरासरी १४०१ तर कमाल १८०१ रुपये दर मिळाला. वर्षभरातील विक्रमी आवक झाल्याने पिंपळगाव बाजार समितीचे आवार तुडूंब भरले. कांद्याच्या चाळीसमोरही वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. एकाच दिवसात ४५ हजार क्विंटल कांद्याची विक्री करून शेतकरी सुमारे चार कोटी रुपये घेऊन घरी परतले.

कोरोनाचे नियम पाळून लिलाव सुरू ठेवले आहे. पारदर्शक व्यवहार, उच्चांकी दर व रोख पेमेंटमुळे जिल्ह्याभरातील शेतकर्यांचा पिंपळगाव बाजार समितीवर विश्वास असल्याचे आज पुन्हा स्पष्ट झाले.

- दिलीप बनकर, आमदार, सभापती, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत

Pimpalgaon Market committee
ग्राउंड रिपोर्ट : नाशिक-जळगाव सीमेवर ‘आओ जाओ घर तुम्हारा’!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.