Market Committee Election Result : बनकरांना बूस्टर डोस, अण्णांचे कदम अडखळले

Market Committee nashik
Market Committee nashikesakal
Updated on

Nashik News : निफाड मतदारसंघाच्या राजकारणाला कलाटणी देऊ पाहणारी पिंपळगाव बाजार समितीच्या सत्तासंघर्षात आमदार दिलीप बनकर हे पुन्हा बाजीगर ठरले.

पिंपळगाव बाजार समितीची सलग चौथ्यांदा सत्ता काबीज करताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिलीप बनकरांना बूस्टर डोस मिळाला आहे. (Pimpalgaon Market Committee election MLA Dilip Bankar win for fourth time in row nashik news)

माजी आमदार अनिल कदम यांनी पवार, बनकर व मोरे या दिग्गज नेत्यांची मोट बांधून बनकर यांच्या सत्तेला जोरदार हादरा देण्याचा प्रयत्न केला. पण त्यात ते अपयशी ठरले. पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत कदम अडखळले असले तरी त्यांनी सहा समर्थकांसह बाजार समितीच्या सभागृहात दमदार एन्ट्री केली आहे. परिवर्तन झाले नसले तरी यापुढे पिंपळगाव बाजार समितीचा कारभार हाकताना आमदार बनकर यांना विरोधकांचे मोठे आव्हान असेल.

आमदार बनकर यांच्या पॅनलसाठी गोदाकाठ तारणहार ठरला आहे. होमपीच असलेला पिंपळगाव व पालखेड गटात अनिल कदम यांच्या परिवर्तनाला साथ देताना मतदार दिसत होते. पण गोदाकाठमध्ये मात्र शेतकरी विकास पॅनलने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे गोदाकाठ बनकरांसाठी तारणहार ठरला. त्यामुळेच सोसायटी व ग्रामपंचायत गटात आठ सदस्य विजय झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Market Committee nashik
Nashik MNS News : एकेकाळी मनसेची ताकद वाढविणारा `हा` नेता पुन्हा स्वगृही परतणार

शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायत गटाला आमदार बनकर यांनी खिंडार पाडले. त्या तुलनेत परिवर्तनाचे नेते ग्रामपंचायत गटात फाजील आत्मविश्‍वासात राहीले. तेथेच अनिल कदम यांच्या सत्तेचे गणित चुकले अन हुकलेही. निफाड मतदारसंघात एकमेव पिंपळगाव बाजार समिती ही संस्था भरभराटीला असून तिचा निसाका किंवा रासाका होऊ द्यायचा नसेल तर पुन्हा बनकरांची सत्ता हवी, हा अंडरकरंट मतदारांना भावला. त्यामुळेच दीर्घकाळापासून असलेली ही सत्ता आमदार बनकर यांना राखता आली. जोरदार टक्कर देणारे अनिल कदम यांनी आगामी विधानसभेसाठी राजकीय पटल पोषक करून ठेवण्यासाठी ही निवडणूक कामी आल्याचे दिसते.

यतीन कदम यांना फेटा परफेक्ट

या निवडणुकीत विजय मिळविलेले कदम यांचे चुलतबंधू यतीन कदम यांनी तालुका पातळीवरील पिंपळगाव बाजार समिती सारख्या संस्थेत आजी-माजी आमदारांच्या आव्हानाला मोडीत काढून प्रवेश केला आहे. अनिल कदम यांच्या पुढील वाटचालीला यतीन कदम अधिक मोठा अडथळा ठरू शकणार आहे. तुल्यबळ व नात्यांगोत्यांची घट्ट जाळे असलेले उमेदवार विजयी करताना मतदारांनी इतर उमेदवारांना कच्चे लिंबू ठरविले.

क्रॉस व्होटींगचा तर पाऊस पडला. त्यातून बाद मतांचे प्रमाण वाढले.अत्यल्प फरकाच्या लढतीचे गणित बाद मतांनी बिघडविले. विधानसभेची सेमीफायनल समजली जाणारी ही निवडणूक आमदार बनकर यांनी जिंकली असली तरी त्यासाठी मोठी दमछाक झाल्याचे दिसते. त्यामुळे नव्याने राजकीय समीकरण जुळवावी लागतील. पिंपळगाव ग्रामपंचायतीची सत्ता गमावल्यानंतर बाजार समितीचा विजय उत्साह वाढविणार असेल

Market Committee nashik
Bazar Samiti Result : चांदवड बाजार समितीवर ‘लोकामान्य’ चे वर्चस्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.