पिंपळगावच्या टोमॅटोचा आखाती देशात डंका! दराला लाली

tomatoes
tomatoesesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : महिन्याभरापूर्वी निच्चांकी पातळीवर गेलेले टोमॅटोच्या (tomatoes) दरात पुन्हा तेजी आली आहे. टोमॅटोच्या दराला लाली चढल्याने शेतकऱ्यांना (farmers) दिलासा मिळाला आहे. आखाती देशासह बांगलादेशामध्ये पिंपळगाव बसवंतचा (pimpalgaon-baswant) टोमॅटो भाव खाऊ लागला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम बाजारभावावर झाला आहे.

सकारात्मक परिणाम बाजारभावावर

टोमॅटोची राजधानी असलेल्या पिंपळगाव बाजार समितीत महिन्याभरापूर्वी टोमॅटोचे दर प्रतिक्रेट ५० ते ७० रुपयांपर्यंत घसरले होते. तब्बल तीन लाख क्रेटपर्यंत आवक सुरू होती. मागणी पेक्षा दुप्पट आवक होऊ लागल्याने दरात पडझड झाली होती. खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून लाल चिखल केला होता. पण गेल्या आठ दिवसांपासून टोमॅटोच्या दराचा आलेख पुन्हा उंचावताना दिसत आहे. देशांतर्गत बाजारपेठेसाठी सरासरी १५० तर निर्यातक्षम टोमॅटोला २५० रुपये प्रती क्रेटचा भाव मिळू लागला आहे.

दुबई, बांगलादेशामधून मागणीत वाढ

परदेशात भारताच्या टोमॅटोला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. इराण मधील टोमॅटोचा हंगाम संपला आहे. त्यामुळे पिंपळगाव बसवंत, लासलगाव, पांढुर्ली येथे दररोज दुबई, ओमान, या आखाती देशात व बांगलादेशामध्ये दोन हजार टन टोमॅटो पोहचत आहे. बांगलादेशाला ट्रक ने चार दिवसात तर आखाती देशात जलवाहतुकमार्गे सातव्या दिवशी पिंपळगावचा टोमॅटो तेथील बाजारपेठत पोहचत आहे. द्राक्ष, कांदा पाठोपाठ नाशिकच्या टोमॅटोनेही परदेशी बाजारपेठ कवेत घेण्यास सुरवात केली आहे.

tomatoes
देशांतर्गत मागणी वाढली; तब्बल 280 कोटींच्या कांद्याचा वांदा

खरेदीसाठी चढाओढ

पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक काहीशी घसरली असून दररोज दोन लाख क्रेट आवक होत आहे. मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये खरेदीसाठी चढाओढ लागली आहे. देशांतर्गत बाजारपेठेसाठी किमान १००, कमाल २००, तर सरासरी १५० रुपये प्रतिक्रेट दर मिळतो आहे. निर्यातक्षम टोमॅटोला दोनशे ते तीनशे रुपये दर मिळू लागला आहे. दर वाढून शेतकऱ्यांकडे पैसे येऊ लागल्याने पिंपळगावच्या बाजारपेठत उलाढाल वाढली आहे. पिंपळगाव बाजार समितीत देशांतर्गत उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तराखंड यासह येथे दररोज दीड क्रेट पोहचत आहे.

आखाती देशांतून मागणी वाढल्याने टोमॅटोचे दर वाढले आहेत. निर्यातीसाठी कंटेनरची भाडेवाढ झाल्याने निर्यातीला मर्यादा आल्या आहेत. अन्यथा ही निर्यात दुप्पटीने राहिली असती. परदेशातील मागणी कायम राहिल्यास टोमॅटोचे दर वधारलेले राहतील. - भूषण पारख, टोमॅटो निर्यातदार.

tomatoes
रामेश्‍वर कृषी बाजारात लाल कांदा दाखल, मिळाला उच्चांकी भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.