Nashik News: पिंपळगावला शवविच्छेदन कक्ष बंद! केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील विदारक चित्र

Dr. Bharati Pawar latest marathi news
Dr. Bharati Pawar latest marathi newsesakal
Updated on

कोकणगाव : अनेक महिन्यांपासून पिंपळगाव बसवंत येथील शवविच्छेदन कक्ष बंद असल्याने मृतदेहांची अक्षरशः हेळसांड होत आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच हे विदारक चित्र असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. (Pimpalgaons autopsy room closed shocking picture of Union Minister of State for Healths constituency Nashik News)

पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास २० ते २२ गावांचा समावेश होतो. कुठलीही घटना घडल्यास शवविच्छेदन करण्यासाठी याच ठिकाणी यावे लागते.

काही महिन्यांपासून येथील शवविच्छेदन कक्ष बंद असल्याने मृतांच्या नातेवाइकांना वणी, नाशिक किंवा निफाड उपजिल्हा रुग्णालयात जावे लागते. त्यासाठी बराचसा वेळ जाततो. यामुळे साहजिकच आरोग्य यंत्रणेसह पोलिस प्रशासनावर मोठा ताण पडतो.

शिवाय अंतर वाढत असल्याने रुग्णवाहिकेसाठी जादा पैसे मोजावे लागतात. गरीब नातेवाइकांना त्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

याबाबत आरोग्याधिकारी योगेश धनवटे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की लवकरच जोपूळ रोडवरील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष सुरू होणार आहे.

Dr. Bharati Pawar latest marathi news
NMC News: बदल्यांमुळे अभियंता वर्गात धुसफुस! अभियंत्यांमध्ये दोन गट; महापालिकेतील बदल्यांमध्ये राजकारण

"जोपूळ रोडवरील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची तपासणी सुरू आहे. अद्याप शवविच्छेदन कक्ष सुरू करण्यात आलेला नाही. महिनाभरात हा प्रश्न मार्गी लागेल. त्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे." -डॉ. रोहन मोरे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी

"पिंपळगाव बसवंत हे निफाड तालुक्यातील म्हत्त्वाचे शहर असून, आर्थिक केंद्र आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी येथील तरुणाचा अल्प आजाराने मृत्यू झाला हहोता. त्याला पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेलो. मात्र, तेथील शवविच्छेदन केंद्र बंद असल्याचे समजले. तुम्हला निफाडला घेऊन जावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे मृत तरुणाच्या नातेवाइकांना निफाडला जावे लागले. पिंपळगावचे शवविच्छेदन कक्ष बंद असल्याने मृत्यूनंतरही मृतदेहाचे हाल होत आहेत. मृतदेहाचा धार्मिक विधी करण्यासाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागते, ही अत्यंत गंभीर बाब आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे."

-सुरेखा मोरे, सरपंच, कोकणगाव

Dr. Bharati Pawar latest marathi news
Nashik: शाळेत फुलवली नैसर्गिक पोषण परसबाग! नित्यानंदनगर प्राथमिक शाळेत पौष्टिक पालेभाज्या अन फळभाज्या बहरल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.