Nashik Market Committee Election : पिंगळे गटाकडून चुंभळे गटास धक्का तंत्र सुरूच; बाजार समिती निवडणूक रंगणार

election
electionesakal
Updated on

Nashik Market Committee Election : बाजार समिती निवडणूक दिवसागणिक रंगतदार होत चालली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाळू बोराडे व अन्य काहींनी समितीच्या माजी संचालक मंडळाने कामात अनियमित केल्याचा ठपका ठेवत प्रथम जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज करीत माजी खासदार तथा सभापती देविदास पिंगळे यांच्यासह संचालक मंडळ यांचेविरुद्ध अर्ज दाखल केला होता.

मात्र, तत्कालीन संचालक मंडळाला यात क्लीन चीट मिळाली होती. या निर्णयाविरोधात या कर्मचाऱ्यांनी विभागीय सहनिबंधक विलास गावंडे यांच्याकडे अर्ज दाखल केला होते. अर्जदार सुनावणी दरम्यान कायम अनुपस्थित राहत होते.

त्यांना प्रस्तुत अर्ज चालविण्यासाठी काही स्वारस्य नसल्याने सदरचा अर्ज हा निकाली काढल्याने पिंगळे गटाला दिलासा तर चुंभळे गटास आणखी एक धक्का बसला आहे. (Pingle group to Chumble group continues to push technique Nashik Market Committee Election nashik news)

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीत शह प्रतीशहच्या राजकारण सुरू आहे. चुंभळे गट हा पिंगळे गटास खिंडीत पकडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. बाळू बोराडे, सोमनाथ पिंगळे, रघुनाथ धोंडगे व प्रदीप फडोळ यांनी माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध नियमबाह्य काम केले. यामुळे बाजार समिती तोट्यात आली.

तसेच कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता दिला नाही, पदाचा गैरवापर केला, कायदा पायदळी तुडवीत चुकीचे कामे केले. समितीच्या कामात अनियमितता तसेच सेझ वसुली योग्य वेळेत केली नसल्याचा आरोप केला.

तसेच महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज रक्कम वेळेत न भरल्याने अधिक रक्कम भरावी लागली. त्यामुळे बाजार समिती नुकसान झाले. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (समितीची निवडणूक) नियम २०१७ चे नियम १० (३) नुसार माजी खासदार तथा सभापती देविदास पिंगळे व संचालक मंडळ अपात्र करावे, अशी मागणीचा अर्ज जिल्हा उपनिबंधकांकडे दिला होता.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

election
Prohibition Orders : शहरात 29 एप्रिलपर्यंत मनाई आदेश

परंतु निकाल पिंगळे यांच्या बाजूने लागला. अर्जदारांनी जिल्हा उपनिबंधकांकडील आदेशास आव्हान दिले खरे मात्र कधी कोरोनास्थितीमुळे सुनावणी तहकूब करावी लागण्याची अपरिहार्यता तर कधी अर्जदारांची सातत्याने असणारी अनुपस्थिती यामुळे हा तक्रारदारांचा अर्ज निकाली काढण्यात येत असल्याचे विभागीय सहनिबंधकांनी म्हटले आहे.

प्राधिकरणासमोर ९ जानेवारी २०२१ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहकूब केलेल्या सुनावणींचा अपवाद वगळता कामकाज चालविण्यात आले होते. मात्र सदरील अर्जातील सुनावणीत अर्जदार हे १७ मे २०२२ पासून सातत्याने अनुपस्थितीत राहीले.

अर्जदारांनाच अर्ज चालविण्यात स्वारस्य नसल्याचा निष्कर्ष प्राधिकारणाने नोंदवून संबंधित अर्ज निकाली काढण्यात येत असल्याचे आदेश दिले. यात खर्चाबाबत कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत.

election
Business Training : पॅकेजिंग व्यवसाय सुरू करायचाय? जाणुन घ्या नवउद्योजकांसाठीचे हे खास प्रशिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.