Nashik Water Crisis : तालुक्याच्या १६ गावांसाठी महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या नवीन पाइपलाइन दुसऱ्यांदा गाजरवाडी शिवारात फुटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाइपलाइन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. (pipeline of 16 village water scheme burst for second time Waste of water in Gajarwadi Shivara Nashik Water Crisis)
नांदूरमध्यमेश्वर धरणातून लासलगाव १६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन टाकली होती. ती जीर्ण होऊन वारंवार फुटत असल्यामुळे मागील महिन्यात नव्याने पाइपलाइन टाकून १६ गावांचा पाणीप्रश्न मिटविण्याचा प्रयत्न झाला.
मात्र, नवीन पाइपलाइनलाही फुटीचे ग्रहण लागले आहे. मागील आठवड्यात गाजरवाडी शिवारात पाइपलाइन फुटून पाण्याचा अपव्यय झाला. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत तातडीने पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात आली होती.
त्यानंतर अवघ्या आठ ते नऊ दिवसांत पाइपलाइन फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. महिन्याभरापूर्वी झालेली पाइपलाइन एकाच आठवड्यात फुटल्याने या कामांबाबत ग्रामस्थांनी शंका उपस्थित केल्या आहेत.
आधीच जुनी पाइपलाइनचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसत होता. नवीन पाइपलाइनमुळे शेतकऱ्यांचे समाधान होत नाही, तोच नवीन पाइपलाइनलाही फुटीचे ग्रहण लागले आहे
"नवीन पाइपलाइईन भरपूर गाजावाजा करून सुरू करण्यात आली. मात्र, ही पाइपलाइन एक महिनाही विनागळतीची चाललेली नाही. नवीन सहा किलोमीटर पाइपलाइनसाठी शासनाने सात कोटी रुपये खर्च केले आहेत. तीही महिन्यात दोनदा फुटत असेल, लासलगाव विंचूरसह १६ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होणे अवघड आहे.-"प्रकाश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.