Nashik News: सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीवरील पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला बसविलेल्या खिडकीचे वेल्डींग तुटल्याने पळसे शिवारात पाईपलाईन लिकेज झाली.
यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जलवाहिनीचे पाणी शिरल्याने नुकसान झाले तर या योजनेवर अवलंबून असलेल्या शहरातील काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. (Pipeline of Darna water scheme burst nashik news)
सिन्नर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दारणा नदीवरील चेहडी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा योजना काही वर्षांपासून सुरु आहे. शहराचा विस्तार वाढल्याने आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून नव्याने कडवा धरण जलस्रोत असलेली योजना कार्यान्वित झाली असली तरी जुनी दारणाची योजनाही सुरु असून या योजनेतून शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा केला जातो.
या योजनेची पाईपलाईन जिर्ण झालेली असल्याने नेहमीच फुटतूट होत असते. सोमवारी (दि. २७) पहाटे ५ च्या सुमारास पळसे शिवारात या पाईपलाईनला बसविलेल्या खिडकीची वेल्डींग तुटल्याने तानाजी कारभारी टावरे व ज्ञानेश्वर गायखे यांच्या शेतात ही पाईपलाईन लिकेज झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मका, बाजरी व गव्हाच्या शेतात पाणी जाऊन नुकसान झाले.
लिकेज काढण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी पळसे येथे गेले असता संबंधित शेतकऱ्यांनी जोपर्यंत नुकसानीचा पंचनामा होऊन भरपाई देत नाही तोपर्यंत लिकेज काढू देणार नाही अशी भुमिका घेतल्याने लिकेज काढण्यासाठी गेलेले पथक रित्याहाती परतले.
आज (दि. २८) नुकसानीचा पंचनामा केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करुन लिकेज काढण्याचे काम करण्यात येईल असे नगरपालिका प्रशासनाने कळविले आहे.
या योजनेवर अवलंबून असलेल्या रामनगरी, गांवठा, आरोटे गल्ली, उद्योग भवन, सिन्नर शिर्डी महामार्गावरील विजयनगर ,मुक्तेश्वर नगर यासह टँकरने पाणीपुरवठा सुरु असलेल्या भागात एक दिवस उशिरा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे.
सतत पाईपलाईन फुटत असल्याने पाणी उशिरा येणे तसेच पाण्याचा सोडण्याची वेळ ही कधीही सारखी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे अनेकांनी सांगितले. लवकरात लवकर संबंधित पाईपलाईन दुरुस्त करून पाणी नियमित वेळी सोडावे अशी मागणी अनेक नागरिकांकडून करण्यात येत आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.