Nashik News : जॅक्सनच्या वधातील ते पिस्तूल ‘सावाना’मध्ये जतन!

The pistol carried by martyr Ananth Kanhere, collector of Jackson's murder, in the Museum of Public Library Objects.
The pistol carried by martyr Ananth Kanhere, collector of Jackson's murder, in the Museum of Public Library Objects.esakal
Updated on

नाशिक : स्थळ : विजयानंद नाटकघर (पुढे विजयानंद चित्रपटगृह), वेळ : २१ डिसेंबर १९०९, रात्री सव्वानऊची. किर्लोस्कर नाटक मंडळींच्या शारदा नाटकाच्या प्रयोगासाठी नाटकघर प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले होते. जॅक्सन पहिल्या रांगेतल्या राखीव खुर्चीकडे जात असतानाच हुतात्मा अनंत कान्हेरे ओट्यावरून खाली उतरले आणि आपल्या धोतरात ठेवलेले पिस्तूल चपळाईने काढत जॅक्सनवर मागून गोळी झाडली.

ती गोळी जॅक्सनच्या हाताखालून गेली. हे पाहताच, कान्हेरे जॅक्सनच्या समोर आले आणि समोरून त्याच्यावर चार गोळ्या झाडल्या. रक्तबंबाळ झालेला जॅक्सन खाली कोसळला. जॅक्सनच्या वधातील हे पिस्तूल सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयात जतन करण्यात आले आहे. (pistol of hutatma anant kanhere killed colllector Jackson saved in sarvajanik vachanalaya Nashik News )

जॅक्सन कोसळताच उपस्थितांना जॅक्सन आल्यावर फटाके वाजले असावेत, असं वाटले. मात्र नंतर गोंधळ उडाला. मामलेदार, पोलिस असे सारे अवाक् झाले. एकाने कान्हेरेंना पकडले. दुसऱ्याने त्यांच्यावर प्रहार केला. पकडल्यावर कान्हेरे शांत होते. ‘मी पळून जाणार नाही, मी माझे कर्तव्य केले आहे’, असे त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला सांगितले. त्यांनी औरंगाबादचे अनंत बर्वे असे नाव सांगितले.

‘मी हे कृत्य स्वत:च्या मनाने केले आहे, मला कुणाचेही सहाय्य अथवा मार्गदर्शन नाही', असे त्यांनी जबाबात सांगितले. पिस्तूल आपण एका अरब व्यापाऱ्याकडून विकत घेतल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेतील सहभागी अनंत कान्हेरे यांच्यासह कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे या तीन तरुणांना १० एप्रिल १९१० मध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

असा झाला वधाचा प्लॅन

त्याकाळात शहरात ‘वंदे मातरम्’ म्हणण्यावर बंदी होती. ‘वंदे मातरम्’ म्हणणाऱ्यांवर खटला दाखल व्हायचा. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा...’ ही कविता बाबाराव सावरकर यांनी प्रसिद्ध केली होती, म्हणून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ज्येष्ठ विधिज्ञ बाबासाहेब खरे यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. या तीनही गोष्टींचा राग कृष्णाजी कर्वे यांच्या मनात होता. या रागातून त्यावेळचा कलेक्टर जॅक्सनचा वध करावा, अशी कल्पना पुढे आली.

१९०९ च्या सुमारास इंग्लंडमधील चतुर्भुज या इंडिया हाउसमधील आचाऱ्यासोबत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी २० पिस्तुले भारतात पाठवली होती. त्यापैकी एक पिस्तूल कृष्णाजी कर्वे यांनी मिळवले होते. ते वापरण्याचा सराव म्हसरूळ परिसरात केला जात असे.

The pistol carried by martyr Ananth Kanhere, collector of Jackson's murder, in the Museum of Public Library Objects.
Nashik News | अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल मालकावर करावी कारवाई : छगन भुजबळ

कीर्तन-प्रवचनावर बंदी

हुतात्मा कान्हेरेंचे १९ वर्षांचे आयुष्य देशासाठी कारणी लागले. खेड (जि. रत्नागिरी) तालुक्यातील छोट्या गावात कान्हेरेंचा १८९१ मध्ये जन्म झाला. स्वातंत्र्याची ज्वाला त्यांच्यामध्ये प्रज्वलित झाली होती. देशाच्या स्वातंत्र्य युद्धातील एक पाऊल पुढे पडेल, अशी त्यांना खात्री होती. दरम्यान, ऑर्थर मॅसन टिपेट्स जॅक्सन हा नाशिकचा कलेक्टर असताना ब्रिटिशांबद्दलचा भारतीयांच्या मनातील असंतोष दूर करण्याचा प्रयत्न करत होता.

त्याचवेळी इंग्रजांविषयी आदरयुक्त भीती असावी, असाही तो प्रयत्न करत होता. स्वातंत्र्यांची आकांक्षा बाळगणाऱ्यांचे जीवन उद्‌ध्वस्त करत त्यांना तो चिरडून टाकत होता. मिरजच्या तांबे शास्त्रींच्या कीर्तन-प्रवचनावर जॅक्सनने नाशिकमध्ये बंदी घातली. त्यामुळे तरुणांमध्ये जॅक्सनबद्दलचा राग प्रखर झाला. अशा काळात अनंत कान्हेरे इंदूरचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर इंग्रजीच्या शिक्षणासाठी औरंगाबादमध्ये मामांकडे आले.

The pistol carried by martyr Ananth Kanhere, collector of Jackson's murder, in the Museum of Public Library Objects.
Nashik News: अपघात नियंत्रणासाठी बाह्य रिंग रोडबरोबरच उड्डाणपूल; ‘Resilient India’चा सर्वेक्षण अहवाल

अशी पेटली देशप्रेमाची ज्वाला

गंगाराम रूपचंद मारवाडी सराफ यांच्या घरात अनंत कान्हेरेंचे मामा राहत होते. गंगाराम कान्हेरेंचे मित्र. व्यापारासाठी गंगाराम यांच्याकडे येवल्यातील काशीनाथ दाजी टोणपे येत असत. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारतचे सदस्य होते. टोणपे यांच्याकडून मिळालेली देशभक्तीची दीक्षा गंगाराम यांनी कान्हेरेंना दिली.

औरंगाबादमध्ये शस्त्रे मिळतील, असे गंगारामचा मित्र नाशिकचे गणू वैद्यला वाटले. वैद्यला कान्हेरेंचे नाव नाशिकमध्ये ऐकायला मिळाले होते. कान्हेरेंचे चित्रकलेचे शिक्षक दामूअण्णा धारप नाशिकचे. बाबारावांना झालेल्या शिक्षेमुळे कान्हेरे संघटनेत सक्रिय झाले. त्या वेळी जॅक्सनला ठार करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी धारप यांना सांगितले.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

The pistol carried by martyr Ananth Kanhere, collector of Jackson's murder, in the Museum of Public Library Objects.
Nashik News : PFI विरोधातील गुन्ह्याच्या तपासात मुदतवाढ

औरंगाबादहून नाशिकला आले...

कान्हेरेंची ही इच्छा नाशिकमध्ये पोचली. वैद्य यांनी कान्हेरेंचा निश्‍चय नाशिकला आल्यावर विनायक देशपांडे, शंकर सोमण, दाजी जोशी यांना सांगितला. त्या वेळी कृष्णाजी हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...कर्वे मुंबईत वकिलीचा अभ्यास करत होते. सर्वांनी चर्चा करून १९ सप्टेंबर १९०९ ला कान्हेरेंना औरंगाबादहून रेल्वेने नाशिकमध्ये आणले.

देशपांडे यांनी कान्हेरेंना जवळची पिस्तूल दिली. कान्हेरेंनी जॅक्सनला कलेक्टर कचेरीत न्याहाळले. मग नाशिकपासून दूर निर्मनुष्य भागातील झाडावर नेम धरून पिस्तूलमधून गोळी झाडण्याचा सराव सुरू केला होता. पुढे औरंगाबादला जाऊन कान्हेरे परत नाशिकमध्ये आले होते.

वस्तू संग्रहालयात बरेच काही

० विंचूरकर यांच्या शस्त्रागारातील तलवार व ढाल (१७ ते १८ वे शतक)

० अंकुश, भाल्याचे टोल, ढाल, कट्यार, जमधर, जांबिया, सूळ (१६ वे ते १८ वे शतक)

० चिलखत-तोफगोळे

० हसऱ्या भावमुद्रेतील शंभू महादेवाची मूर्ती

० वेगवेगळ्या आवाजाच्या घंटा

० नाशिक रागमाला (लघु चित्रशैली) (१८ वे शतक)

The pistol carried by martyr Ananth Kanhere, collector of Jackson's murder, in the Museum of Public Library Objects.
Teacher Transfer Procedure : जिल्हयातील 177 शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची आज पडताळणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.