PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (ता. १२) नाशिक दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदी यांचा दौरा राजकीय नव्हता मात्र, यात या दौऱ्यातून आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी होर्डिंग माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
शहरात तसेच तपोवन, रोड शो, पंचवटी परिसरात इच्छुकांनी मोठ-मोठे फ्लेकस लावलेले दिसत होते. अगदी चौकाचौकात होर्डिंग लावत लक्ष वेधण्याचा प्रयत्न इच्छुकांनी केल्याचे दिसून आले. (Placard welcoming Prime Minister across nashik city nashik news)
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्या वेळी त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी रामतीर्थावर जाऊन जलपूजन व गोदाआरती केली. काळाराम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेत, तेथील भजनी मंडळातदेखील सहभागी झाले. मंदिराची स्वच्छता त्यांनी या वेळी केली. पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा राजकीय नसल्याचे सांगितले जात होते.
मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यातून आगामी निवडणुकांचे रणशिंग फुकंण्यात आले. लोकसभा निवडणूकच दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व होते. पंतप्रधान मोदी यांनी दौऱ्यात राजकीय भाष्य केले नसले तरी, केंद्र सरकारच्या कामगिरी तरुणाई पुढे मांडली.
पंतप्रधान मोदी स्वतः येणार असल्याने आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी संधी साधत, होर्डिंग माध्यमातून इच्छुकांना ब्रॅंडिग केल्याचे दिसून आले. पंतप्रधान मोदी ज्या मार्गावरून येणार होते, तसेच रोड शो केला, सभा स्थळ आदी भागात इच्छुकांनी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताचे फलक लावले होते.
काही इच्छुकांनी तर, शहरभरातील चौका-चौकात फलक लावलेले दिसत होते. अगदी रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी होर्डिंग दिसत होते. छत्रपती संभाजीनगर रोड परिसर, पंचवटीतील गल्ली-बोळात इच्छुकांचे फलक दिसत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.