Nashik : द्राक्षाच्या गोड शिवारात, तिखट मिरचीचा तडका!

A blooming crop of chilli planted using mulching paper in Babaji Shinde's field.
A blooming crop of chilli planted using mulching paper in Babaji Shinde's field.esakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निफाड तालुका म्हटला की द्राक्ष, ऊस अशी जिभेवर गोड चव पेरणारी फळपिकाची उत्पादनांची राजधानी अशी ओळख. पण याच निफाडच्या पूर्व-उत्तर भागातील वनसगाव व परिसरातील शेतकरी झणझणीत तिखट मिरचीचे दर्जेदार उत्पादन घेत आहे.

मिरचीचे आगर अशी या परिसराची ओळख झाली असून शेतकऱ्यांच्या मेहनतीच्या मिरचीला उत्त्पन्नाचे गोड फळ सध्या लगडले आहे. या परिसरातील मिरचीची काढणी सुरू झाली असून राज्य-परराज्यात येथील मिरची पोचत आहे. (Plantation of chillies on 500 acres in 6 villages of Vanasgaon area Nashik Latest Marathi News)

कष्टाला नियोजनाची जोड दिल्यास शेतकरी आर्थिक उत्त्पन्न मिळवू शकतो याचा प्रत्यय गेल्या सात वर्षापासून मिरची उत्पादक शेतकरी घेत आहे. वनसगाव, सावरगाव, नांदुरखुर्द, रेडगाव, थेटाळे, सारोळे गावांमध्ये एकुण पाचशे एकरहून अधिक क्षेत्रावर मिरचीचे पीक सध्या बहरलेले आहे. आरमार, नंदीता, पिकाडोर हे वाण सध्या येथे पिकविले जात आहेत.

भाजीला तिखट तडका व ढेचा बनविण्यासाठी येथील मिरच्या आता बाजारात येऊ लागल्या आहेत. वनसगाव परिसरातील सहा ते सात गावातील शेतकऱ्यांना खादगाव येथील बाजारपेठ वरदान ठरते आहे. मिरची खरेदी करणारे व्यापारी येथे मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे बाजारभावही उच्चांकी मिळतो. सध्या 30 रूपये प्रतिकिलो असा दर मिळतो आहे.

एकरी दोनशे क्विंटल उत्पादन...

बाबाजी शिंदे (नांदुर खुर्द), प्रकाश कुशारे (सावरगाव), गणपत चव्हाण (रेडगाव) यासह सुमारे तीनशे शेतकरी मिरचीच्या उत्पादनांचा गोडवा चाखत आहे. पूर्वी हेच शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घ्यायचे. पण दराचा भरोसा नाही, त्यात रोगांच्या आक्रमणाने उभे पीक सोडून द्यावे लागत असे, यामुळे येथील शेतकऱ्यांचा कल मिरचीकडे वाढत आहे.

वर्षभर मिरचीचे पिक सुरू असते, त्यात भाव नसेल तर उन्हात वाळवून लाल मिरची सुमारे 250 रूपये किलोपर्यत विकली जाते. एकरी 50 हजार रूपये खर्चात सुमारे 200 क्विंटल मिरचीचे उत्पादन निघते. त्यातून किमान खर्च वजा जाता चार लाख रूपये हमखास मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.

A blooming crop of chilli planted using mulching paper in Babaji Shinde's field.
Online Shoppingने बाजारपेठा ओस; मनमाडला ऐन दिवाळी व्यावसायिकांमध्ये चिंता

एक लाख क्विंटलचे उत्पादन

मल्चिंग पेपरसह आधुनिक पध्दतीचा वापर करून शेतकरी दर्जेदार मिरची पिकवू लागल्याने येथील मिरचीला परराज्यातून मागणी वाढली आहे. वर्षभरात या परिसरातून सुमारे एक लाख क्विंटल मिरचीचे उत्पादन होते. त्यातून सुमारे वीस कोटी रूपयांचे अर्थकारण फिरते. तिखट मिरचीची गोड कहाणी ही पारंपारिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

"भाव घसरलेले असले तरी किमान खर्च तरी वसूल होतो व दर चांगला असेल तर चांगले उत्पन्न मिळते, असा मिरची पिकाचा गेल्या पाच वर्षाचा माझा अनुभव आहे. टोमॅटोपेक्षा निश्‍चित शाश्‍वत उत्पादन देणारे पीक असल्याने परिसरातील बहुतांश शेतकरी मिरचीकडे वळले आहेत." - बाबाजी शिंदे, नांदुरखुर्द.

A blooming crop of chilli planted using mulching paper in Babaji Shinde's field.
Nashik : Mumbai- Agra National Highway बनला मृत्यूचा सापळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.