Nashik News : ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे रोपण; जागतिक पर्यटनात नाशिकचे महत्त्व वाढणार

Plantation of historical Mahabodhi tree in Buddha memorial area nashik news
Plantation of historical Mahabodhi tree in Buddha memorial area nashik newsesakal
Updated on

Nashik News : श्रीलंकेच्या अनुराधापूर येथून आणलेल्या व येथे रोपण झालेल्या बोधी वृक्षामुळे धार्मिक नगरी असलेल्या नाशिकचे महत्त्व आणखी वाढले असून, ज्या परिसरात वृक्षाचे रोपण करण्यात आले, त्या बुद्ध स्मारकाची उंची वाढली आहे.

बोधी वृक्षामुळे नाशिकला देश-विदेशातील पर्यटक भेट देतील. यातून धार्मिक पर्यटन विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

राज्य शासन व शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नाशिकच्या बुद्ध स्मारक त्रिरश्मी बुद्ध लेणी परिसरात श्रीलंकेतील अनुराधापूर येथे सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा हिने लावलेल्या बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. (Plantation of historical Mahabodhi tree in Buddha memorial area nashik news)

श्रीलंकेतील बोधी वृक्षाचे प्रमुख हेमरत्न नायक थेरो, श्रीलंकेचे केंद्रीय बुद्ध शासन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विदुर विक्रमनायक, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, श्रीलंकेतील महिंदावस थेरो पूजनीय भिक्खू डॉ. वास्कडूवे, मलेशियातील महाथेरो संघराजा भिक्खू सरणांकर, आनंदा नायके थेरो, भिक्खू नाराणपणावे, भिक्खू डॉ. पोंचाय, महाराष्ट्र भिक्खू संघाचे सल्लागार प्रा. डॉ. भदन्त खेमधम्मो महास्थवीर, आमदार अॅड. राहुल ढिकले, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे भिक्खू सुगत थेरो, भिक्खू संघरत्न थेरो, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, समन्वयक आनंद सोनवणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रकाश लोंढे, बॉबी काळे, दिलीप साळवे, संजय खैरनार, शरद काळे, बाळासाहेब शिंदे, अर्जुन पगारे, विकी चाबुस्कवार आदी उपस्थित होते.

या वेळी अधिक बोलताना भुजबळ म्हणाले, की जग, देश, राज्य व कुटुंबे कलहाला सामोरे जात असताना भगवान गौतम बुद्धांनी दिलेला शांतता व अहिंसेचा मार्ग जगाला वाचवू शकतो. धार्मिक महत्त्व असलेल्या नाशिक व महाराष्ट्राला बोधी वृक्षाच्या माध्यमातून अमूल्य भेट मिळाली. बोधी वृक्षामुळे नाशिकच्या वैभवात अधिक भर पडेल. पर्यटनात वाढ होऊन या स्थळाला जागतिक महत्त्व प्राप्त होईल.

जागतिक स्तरावर पर्यटनस्थळ

ग्रामविकासमंत्री महाजन म्हणाले, की बोधी वृक्षाच्या रोपणामुळे त्रिरश्मी लेणीचे महत्त्व अधिक वाढेल. जागतिक स्तरावर पर्यटनस्थळ म्हणून नाशिक विकसित होईल. पर्यटक नाशिकमध्ये येतील. बोधी वृक्षामुळे नाशिकमध्ये अभिनंदनीय असे कार्य झाले.

Plantation of historical Mahabodhi tree in Buddha memorial area nashik news
Onion Rates Hike: विजयादशमीच्या पूर्वसंध्येला उन्हाळी कांदा भावाचे सीमोल्लंघन! क्विंटलला 551 ते 750 रुपयांची वृद्धी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, की विजयादशमीला बोधी वृक्ष रोपणामुळे नाशिककरांना आनंदाची पर्वणी साधता आली. नाशिकसाठी ही बाब गौरवास्पद आहे. हजारो वर्षांची ज्ञानाची परंपरा असलेल्या बोधी वृक्षामुळे नाशिकचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. पालकमंत्री भुसे यांनी बोधी वृक्षामुळे नाशिकची वेगळी ओळख निर्माण होणार असल्याचे सांगितले.

भारत-श्रीलंका संबंध वृद्धिंगत

श्रीलंकेचे केंद्रीय बुद्ध शासन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विदुर विक्रमनायके यांनी बोधीवृक्ष रोपणामुळे भारत व श्रीलंकेचे संबंध अधिक सुदृढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

बोधी वृक्षाचे महत्त्व

सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदीच्या काठावर बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे हे बोधी वृक्ष अतिपूजनीय आहे. सुमारे दोन हजार ६०० वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्ध भारतातील बोधगया, बिहार येथे निरंजना नदीच्या काठावर असलेल्या इसाथू वृक्षासमोर बसले होते. या क्षणी, जेव्हा ते झाडाच्या विरुद्ध बसले, तेव्हा बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले.

ते बोधी वृक्ष म्हणून ओळखले जाऊ लाग ले. त्यानंतर बौद्ध संघमित्रा महाथेरी यांना सम्राट अशोकाने भारतातून श्रीलंकेत पाठवले. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा येथील रॉयल पार्कमध्ये बोधी वृक्षाची शाखा लावली. याला महाबोधी वृक्ष नावाने ओळखले जाते.

Plantation of historical Mahabodhi tree in Buddha memorial area nashik news
Maratha Reservation: येवल्यात आज मराठाद्वेषी रावणाचे दहन; आरक्षणासाठी ‘अन्नत्यागा’चा 8 वा दिवस

पौर्णिमेला वृक्षाचे दर्शन

बोधी वृक्षाचे विधीवत पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्रीलंकेसह कंबोडिया, थायलंड, सिंगापूर येथील भन्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. भन्ते सुगन्त यांनी महिन्यातून एकदा पौर्णिमेला बोधी वृक्षाचे दर्शन घेता येणार असल्याची माहिती दिली.

तथागतांच्या शिकवणुकीची उजळणी : एकनाथ शिंदे

नाशिकच्या पवित्र भूमीत बुद्धस्मारक परिसरात बोधी वृक्षाच्या रोपणातून आज आपण पुन्हा एकदा तथागतांच्या शांतीच्या शिकवणीची उजळणी करणार असल्याचे गौरवोद्‍गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण कार्यक्रमाला दूरदृश्‍यप्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या, त्या वेळी ते बोलत होते. विजयादशमीच्या दिवशी बोधी वृक्ष रोपणाचा अपूर्व असा योग जुळून आला आहे.

भगवान बुद्धांचा हा शांतीचा आणि ज्ञानमार्गाचा संदेश घेऊनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाची दिशा दाखविली. महाराष्ट्र पुरोगामी आणि समता, बंधुता, एकता, संतांची भूमी आहे. या संतांनी समतेचा वसा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीला स्वाभिमानाचा मंत्र दिला.

महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महाराष्ट्र सुपुत्रांनी महाराष्ट्राची जडणघडण केली. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आणि अन्य राज्यांसाठी आदर्श म्हणून काम करतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला सामाजिक न्यायाची वाटच आमच्यासाठी आदर्श आहे. त्याच आदर्शांवर आमची वाटचाल सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी सांगितले.

Plantation of historical Mahabodhi tree in Buddha memorial area nashik news
Nashik Onion Rates Hike: नामपूरला कांदा @4000! मागणी वाढत असल्याने प्रथमच उच्चांक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.