Nashik : ग्रीन मालेगाव ड्राईव्ह अंतर्गत 60 हजार झाडांची लागवड

Abdullah Trust
Abdullah Trustesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील पूर्व भागात प्रतिकूल परिस्थितीत अब्दुल्ला ट्रस्ट या एका कुटुंबीयाच्या माध्यमातून ‘ग्रीन मालेगाव ड्राइव्ह’ (Green Malegaon Drive) ही मोहीम सुरू झाली. ट्रस्टने इच वन प्लान्ट वन या स्लोगनच्या आधारे कामकाजाला सुरवात केली. मोहिमेला विद्यार्थी, शहरातील शिक्षित नागरिक, मशिद, मदरसा आदींचे विश्‍वस्त व सामान्य नागरिकांचा प्रतिसाद लाभला. या मोहिमेंतर्गत शहर व परिसरात पाच लाख झाडे (Tree Plantation) लावण्याचा निर्धार ट्रस्टने व्यक्त केला आहे. आठ वर्षांच्या कालावधीत या मोहिमेंतर्गत ७५ हजार झाडांची लागवड झाली. यातील ५० हजार वृक्ष जतन झाले आहेत. या मोहिमेला आता ‘लोग साथ आते गए और कारवॉं बनता गया’ असे स्वरुप आले आहे. (Planting of 60000 trees under Green Malegaon Drive Nashik News)

कर सल्लागार मोहम्मद युसूफ अब्दुल्ला व त्यांची पत्नी पै. नर्गिसबानो यांनी शहरासाठी काही तरी चांगले कामकाज करण्याची इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा आदर करत त्यांची मुले आसिफ युसूफ अब्दुल्ला, कलीम अब्दुल्ला, फईम अब्दुल्ला यांनी २०१४ मध्ये ‘ग्रीन मालेगाव ड्राइव्ह’ ही मोहीम सुरू केली. सोशल मीडियावर त्याचा प्रचार, प्रसार केला. फेसबुक अकाउंटवर मोहिमेच्या प्रत्येक घडामोडीची माहिती येऊ लागली. या त्रिकुटाला बहीण फरहदजहॉं मोहंमद युसूफ, नगरसेवक नजीर फल्लीवाले आदींबरोबर अल्प मजुरीत माळी काम करणाऱ्या दीपक माळी, कलीमुद्दीन अहमद, फुरकान अन्सारी, फैसल अहमद आदींसह आम्ही मालेगावकर समिती, न्यू इरा इंग्लिश स्कूल, मालेगाव क्लब, पोलिस प्रशासन, मालेगाव युवा संघटना व शहरातील मशिद, मदरसा, शाळांचे विश्‍वस्त यांची साथ लाभली. विविध भागांत, व शाळांच्या आवारात कडुनिंब, बदाम, करंज, आकाश निम आदी वृक्षांची लागवड सुरू झाली. वृक्षदिंडी, वृक्षारोपण, वृक्षवाटप अशा विविध कार्यक्रमांनी या मोहिमेला बळ मिळाले. रोप व जाळीच्या पिंजऱ्यासाठी अब्दुल्ला परिवाराने आजपर्यंत साडेतीन ते चार लाख रुपये खर्च केले.

Abdullah Trust
तरुणाची अनैतिक संबधातून हत्या; पोलिसांनी लावला 18 तासात छडा

वृक्षारोपणात सहभागासाठी संपर्क क्रमांक देण्यात आला. नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संबंधितांना वृक्षरोपण व प्रसंगी जाळी-पिंजरा देण्यात आला. भक्कम पिंजऱ्यासाठी बाराशे ते पंधराशे रुपये खर्च येत होता. त्याऐवजी थेट सहा फुटाची तारजाळी व त्याला हिरवे नेट लावून पिंजरा तयार करण्यात आला. ट्रस्टने धनदाई नर्सरी, स्वाले नर्सरी येथून ठोक स्वरुपात रोख खरेदी केले. विविध शाळा, महाविद्यालये, शेकडो मशिदी, मदरसे, मोकळे भूखंड व अनेकांच्या घरासमोर वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमेत महादे मिल्लत मदरसा मैदानावर करण्यात आलेले वृक्षारोपण नजरेस भरण्यासारखे आहे. येथील वृक्ष पंधरा ते वीस फूट उंचीची आहेत. याबरोबरच शहरातील दाट लोकवस्तीत घरासमोर पाण्याची टाकी ठेवण्याऐवजी ‘एक वृक्ष लावा’ यासाठी या मोहिमेतून जनजागृती करण्यात आली.

Abdullah Trust
ज्‍येष्ठ नागरिकांना प्रसाधनगृहे शोधण्याचा मनस्‍ताप

जनजागृती, न्यायासाठी हरित लवादाकडे दाद

अब्दुल्ला ट्रस्टने वृक्षारोपण मोहिम राबवितानाच देशी वृक्ष लागवडीसंदर्भात जनजागृती केली. त्याचवेळी शहरातील धूळ, सायजिंग गिट्टी कारखान्यांनी होणारे प्रदूषण, नदी प्रदुषण, मनपाकडून वृक्षारोपणाचा अभाव, डम्पींग ग्राऊंड स्थलांतर यासह विविध मुद्द्यांवर हरित लवादाकडे दाद मागितली. दिल्ली येथील हरित लवादाच्या आदर्शकुमार गोयल यांच्या पुर्ण पिठाने शहरातील समस्या मार्गी लावाव्यात असा आदेश देतानाच मनपाला विविध सूचना दिल्या. लवादाच्या निकालामुळे प्रदुषणाला आळा बसला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()