Aviral Godavari Activity: गोदावरी स्वच्छतेसाठी प्लास्टिक संकलन मोहीम; महात्मा गांधी जयंतीदिनी अविरल गोदावरी उपक्रम

Plastic collection drive
Plastic collection driveesakal
Updated on

Aviral Godavari Activity : ब्रह्मगिरी ते राजमहेंद्रीदरम्यान अविरल गोदावरीसाठी सुरू केलेल्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात येत्या २ ऑक्टोबरला शहरात प्लास्टिक संकलन केले जाणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने नमामी गोदा आणि सत्संग फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी ही माहिती दिली. (Plastic collection drive to clean Godavari Aviral Godavari activities on Mahatma Gandhi Jayanti nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी खटल्यातील याचिकाकर्ते राजेश पंडित, भारतीय जनता पक्षाचे नेते लक्ष्मण सावजी हेही उपस्थित होते.

उद्गीरकर म्हणाले, की आगामी कुंभमेळ्यापर्यंत ब्रह्मगिरी ते रामतीर्थदरम्यान हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह आणि सत्संग परिवाराचे क्रियायोग गुरू श्री एम यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबविला जाईल.

श्री एम यांच्या मार्गदर्शनाखाली सी-२० परिषदेत ही संकल्पना मांडण्यात आली. त्यानुसार या उपक्रमातील पहिल्या टप्प्यात २ आणि ३ ऑक्टोबरला नाशिक येथे विविध ११ ठिकाणी प्लास्टिक कचरामुक्त गोदावरी अभियान राबविले जाणार आहे.

Plastic collection drive
Festival Unity: कलेच्या माध्यमातून सलोखा जपण्याचा प्रयत्न! मुस्लिम तरुणाकडून बाप्पाच्या मूर्तीला फेट्याचा साज

ब्रह्मगिरी पर्वतावर पूर्वीसारखे जंगल बनविणे, प्राचीन कुंडाचे पुनर्जीवन, माती अडवा-पाणी जिरवा, ब्रह्मगिरी परिसर प्लास्टिकमुक्त करणे हे या उपक्रमाचे नियोजन आहे. नमामी गोदा फाउंडेशन, सत्संग फाउंडेशन, तरुण भारत संघ, राज्य शासनासह विविध स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा उपक्रम राबविला जाणार आहे.

महात्मा गांधी जयंतीदिनी २ ऑक्टोबरला सकाळी साडेसातला आनंदवली ते रामतीर्थ, प्लास्टिक कचरामुक्तीचा उपक्रम राबविला जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन दुपारी चारला इस्पॅलियर शाळेत ‘माय ट्री’ या विषयावर श्री एम यांच्या संवादाचा कार्यक्रम होईल.

सायंकाळी साडेसहाला पुन्हा सत्संग परिवारातर्फे श्री एम यांचे ‘आध्यात्म आणि सेवा’ या विषयावर शंकराचार्य न्यासच्या कृतकोटी सभागृहात व्याख्यान होईल.

३ ऑक्टोबरला सकाळी साडेसातला ब्रह्मगिरी पर्वतावर पूर्वीसारखे जंगल वाढविण्यासाठी वृक्षारोपण, प्राचीन कुंडाचे पुनर्जीवन, ब्रह्मगिरी परिसर प्लास्टिक कचरामुक्त उपक्रमाचा प्रारंभ होईल.

Plastic collection drive
Citylinc Bus Service: ‘सिटीलिंक’कडून पार्सल सेवा सुरू करण्याचा निर्णय; तोटा भरण्यासाठी उपाययोजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.