MSRTC Short Stay Allowance : 75 रुपयांत करायचे काय? अल्प मुक्कामी भत्त्यामुळे वाहक- चालकांचे हाल

st msrtc
st msrtc esakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : एसटी चालक-वाहकांना आधीच अत्यल्प वेतनावर समाधान मानावे लागत आहे. त्यातच चार वर्षांपासून एसटी चालक-वाहकांना दिल्या जाणाऱ्या मुक्कामी भत्त्यात वाढ करण्यात आलेली नाही.

आजही त्यांना केवळ ७५ ते १०० रुपये भत्ता मिळत आहे. त्यामुळे त्यांचे जेवण बेचव झाले असून रात्रीची झोप उडाली आहे. इतक्या कमी भत्त्यात राहायचे आणि पोट भरायचे कसे असा प्रश्न चालक-वाहकांना पडला आहे. (Plight of carriers drivers due to 75 rupees MSRTC Short Stay Allowance nashik news)

राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कडून मुक्कामी बस घेऊन जाणाऱ्या चालकांना ७५ ते १०० रुपये भत्ता मिळतो. गावांसाठी ७५ रुपये, तालुक्याच्या ठिकाणी ८० आणि शहरासाठी १०० रुपये भत्ता दिला जातो. सर्वच ठिकाणी राहण्याची व्यवस्था होत नाही. महागाईच्या काळात ७५ रुपयात साधे पोटभर जेवण मिळत नाही.

तेवढ्या पैशात लॉजची व्यवस्था करणे तर शक्यच नाही. मुक्कामी बस घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना २०० ते २५० रुपये खर्च येतो. व्यवस्था नसल्याने त्यांना गाडीत झोपावे लागते. सध्या थंडीच्या दिवसात त्यांचे चांगलेच हाल होत आहे.

पिपंळगाव बसवंत आगारात ग्रामीण भागासाठी दिवसाला १२ मुक्कामी फेऱ्या आहेत. गावात रात्री प्रवाशांना सोडणे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तेथून प्रवासी घेऊन येणे अशी व्यवस्था असते. त्यामुळे अल्प भत्ता देऊन महामंडळ कर्मचाऱ्यांची थट्टा करीत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

st msrtc
Nashik News : पुणे विद्यापीठाने MA परीक्षा पुढे ढकलावी; AISF तर्फे विद्यापीठ प्रशासनाला निवेदन

मुक्कामी जाणाऱ्या बस..

दुधखेडा, पिंप्री, थडीसारोळे, ननाशी, जालखेड, ओझे, बहाद्दुरी, खुंटविहीर, तळवाडे.

पाणी, नाश्त्यावरच होतो खर्च

साधारण पाण्याच्या एका बॉटलची किंमत २० रुपये आहे. नाश्ताही ४० रुपये पर्यंत जवळपास होतो. यात ७५ रुपयात जेवणाचाच खर्च भागत नसल्याने मुक्कामी बस घेऊन जाण्यास कर्मचारी तयार नसल्याचे चित्र आहे.

"वेळोवेळी भत्त्यासह सगळ्या भत्त्यात वाढ करणे अपेक्षित होते. दुर्दैवाने सरकार व प्रशासनाकडून कुठलाही विचार न केल्यामुळे आज कर्मचाऱ्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. या भत्त्यात नव्याने दुरुस्ती करणे गरजेचे आहे."-संदीप कुयटे, सचिव, एसटी कामगार संघटना, पिंपळगाव बसवंत

st msrtc
Nashik News : शहरातील एकेरी मार्गाबाबत नागरिकांत संभ्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.