वणी (जि. नाशिक) : सप्तशृंग गडाकडे (Wani saptashrungi gad) पायवाटेने जाणाऱ्या वणी - चंडीकापुर मार्गावरील पुलाला भगदाड पडून पुलाचा भाग वाहुन गेल्याने या मार्गावरुन गडावर जाणारे पदयात्रेकरु, पर्यटकांबरोबरच वणी व चंडीकापूर शिवारातील शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. (Plight of devotees as bridge on Vani Saptasringi Gad padayatrekaru route was swept away nashik Latest Marathi news)
सप्तशृंगगडावर वणी चंडीकापुर मार्गे वणी येथुन पायी जाण्याचा जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावरील देव नदीस दहा दिवसांपूर्वी आलेल्या मोठ्या पुरामध्ये नदीवरील पुलाचा काही भाग वाहून गेला आहे.
त्यामूळे या रस्त्यावरील दळणवळणाची यंत्रणा बंद झाली आहे. या रस्त्याने वणी बाजुकडून गडावर जाणारे येणारे भाविक व पर्यटक नियमित पणे वर्दळ असते. तसेच चंडीकापूर येथून शेकडो विद्यार्थी या मार्गावरुन शाळा - महाविद्यालयासाठी या मार्गावरुन नियमित ये जा करतात. तसेच वणी व चंडीकापूर शिवारातील शेतकऱ्यांची शेतमालाची वाहतूकही याच मार्गाने होत असल्याने ट्रॅक्टर, पीक अप, टेम्पो अशी शेकडो वाहणांची या रस्त्यावरुन वर्दळ असते.
मात्र पुलाचा मोठा भाग वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असल्याने भाविकांबरोबरच शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. या पुलाच्या कथड्याची बाजु शिल्लक असल्याने या कथड्यावरुनच सध्या परीसरातील नागरिक दुचाकीवरुन व पायी असा जीव घेणा प्रवास करीत आहे.
आठ- दहा दिवसांच्या संततधार पावसानंतर दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने शेतीकामांना वेग आला आहे. अशातच पुलामुळे कृषीसाहित्य व मालाची वाहतूकीचा खोळंबा होत असून सात ते आठ किलो मीटरचा वळसा घालून शेतकरी पर्यायी मार्गाचा वाहतूकीसाठी अवलंब करीत आहे.
असे असले तरी विद्यार्थी, सर्वसामान्य शेतकरी व भाविकांचे यामूळे हाल होत आहे. आगामी काही दिवसांत श्री सप्तशृंगी माता व जगदंबा मातेचा नवरात्रोत्सव व कावड यात्रा येवू ठेपली असून या मार्गाने तीस ते चाळीस हजार पदयात्रेकरु व कावडीधारक गडावर मार्गक्रमन करीत असतात.
त्यामूळे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी अग्रक्रमाने या पुलाची दुरुस्ती करुन पुल वाहतूकीसाठी खुला करण्याची मागणी श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, सुनिल थोरात, बाळासाहेब थोरात, रविंद्र थोरात, प्रकाश थोरात, पंकज थोरात, जयवंत थोरात, काशिनाथ थोरात, प्रमोद थोरात, अक्षय थोरात, राजेंद्र देशमुख, प्रवीण देशमुख, योगेश थोरात, अनिल थोरात, राकेश थोरात, शिवनाथ क्षिरसागर, उत्तमराव थोरात, सोनू थोरात, राजू महाले, उखाराम शेळके, भरत कड, राजेंद्र भरसट, वसंतराव थोरात, सुभाष पारख, प्रकाश शर्मा, प्रफुल पारख आदींनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.