PM Kisan Sanman Yojana : राज्यातील 85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज 'इतके' कोटी रुपये होणार जमा

PM Kisan Nidhi Yojana
PM Kisan Nidhi Yojanaesakal
Updated on

PM Kisan Sanman Yojana : राजस्थानमधील सीकरमध्ये गुरुवारी (ता. २७) सकाळी अकराला होत असलेल्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील चौदाव्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात करतील.

त्यात देशातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांचा समावेश असेल. महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १ हजार ८६६ कोटी रुपये वर्ग होतील. (pm kisan samman nidhi yojana 1 thousand 866 crore in account of 85 lakh farmers in state today nashik news)

सन्मान निधी योजना १ फेब्रुवारी २०१९ पासून राबवण्यात येत असून शेतकरी कुटुंबास महिन्याला दोन हजार रुपयांप्रमाणे तीन समान हप्त्यात एकूण सहा हजार रुपये प्रत्येक वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेतंर्गत राज्यातील १ कोटी १७ लाख ५२ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. संकेतस्थळावर त्यापैकी पात्र शेतकऱ्यांची संख्या ९७ लाख ९३ हजार इतकी आहे.

यापूर्वीच्या तेराव्या हप्त्याअखेर एकूण २३ हजार ७३१ कोटी ८१ लाख रुपये १ कोटी १० लाख ५३ हजार शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. तेरा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ८१ लाख १३ हजार इतकी आहे. चौदाव्या हप्त्यासाठी भूमिअभिलेख नोंदीप्रमाणे संकेतस्थळावर ९५ लाख ६२ हजार शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

PM Kisan Nidhi Yojana
PM Kisan Yojana: PM किसान योजनेच्या 14व्या हप्त्यापासून 3 कोटी शेतकरी राहू शकतात वंचित, जाणून घ्या कारण

ई-केवायसी प्रमाणीकरण ८५ लाख ६८ हजार शेतकऱ्यांचे झाले असून बँक खात्याशी आधारचे संलग्नीकरण ८८ लाख ९२ हजार शेतकऱ्यांनी केले आहे. तीनही बाबींची पूर्तता केलेल्या चौदाव्या हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या ७७ लाख ३३ हजार इतकी आहे. केंद्राने ई-केवायसी प्रमाणीकरण शिथिल केल्याने ८५ लाख ६६ हजार शेतकरी चौदाव्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत.

राज्याच्या योजनेचा लाभ

राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी राज्याच्या अनुदानाची भर घालण्यासाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी' योजना जाहीर केली होती. केंद्राप्रमाणे राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाला बारा हजार रुपये मिळतील. केंद्राच्या योजनेच्या पुढील प्रत्येक हप्त्याचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे स्वतःच्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

PM Kisan Nidhi Yojana
PM Kisan Sanman Yojana : या चुका करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत योजनेचे पैसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.