PM Kisan Samman Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. आतापर्यंत शासनाने अनेकदा संधी देण्यात आली.
आता ई केवायसी करण्यासाठी सोमवार (ता.९) पर्यत अंतिम मुदत असल्याने २ हजार ४३६ शेतकरी खातेदारांनी ई-केवायसी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अन्यथा, त्यांचे किसान सन्मान योजनेचा ६ हजार रुपयाचा हप्ता कायमचा बंद होणार आहे. (PM Kisan Samman Yojana Deadline for KYC till 9 oct nashik news)
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पोर्टलवर रजिस्टर केलेल्या शेतकरी बांधवांना केंद्र शासनाकडून ६ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर मिळतात. वर्षात प्रत्येकी २ हजाराचा हप्ता शेतकऱ्यांना मिळतो. सदर पैसे मिळणे कामी शेतकरी बांधवांनी आधारकार्डचा उपयोग करून ई-केवायसी करणे गरजेचे आहे.
तालुक्यात आजपर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत ३५ हजार ६७ शेतकरी बांधव खातेदारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी ३२ हजार ६३१ शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या मदतीने ई- केवायसी पूर्ण केले आहे.
यापैकी भिंगारे, देवदरी या गावांमध्ये शंभर टक्के ई-केवायसी पूर्ण झालेली आहे परंतु तालुक्यातील अजूनही वारंवार सांगूनही २ हजार ४३६ शेतकरी खातेदार यांनी ई केवायसी न केल्यामुळे त्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा ६ हजार रुपयाचा हप्ता कायमचा बंद होण्याच्या मार्गावर आहे.
कृषी विभागाने अथक प्रयत्न करून मोहीम स्वरूपात प्रत्येक गावामध्ये मोहीम राबवून सप्टेंबर महिन्यामध्ये १ हजार ५०६ शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रत्यक्ष पूर्ण करून घेतली आहे. तरीपण आज अखेर शिल्लक राहिलेल्या २ हजार ४३६ शेतकरी बांधवांची ई-केवायसी करणे बाकी आहे. परिणामी ई-केवायसी बाकी असलेल्या शेतकरी बांधवांच्या याद्या त्या गावातील ग्रामपंचायत स्तरावर लावण्यात आलेल्या आहेत.
ई-केवायसी करण्याचे बाकी असलेल्या शेतकरी बांधवांनी ग्रामपंचायत स्तरावर तसेच संबंधित गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करून तत्काळ दोन दिवसात ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे. जे शेतकरी बांधव या दोन दिवसात ई केवायसी पूर्ण करणार नाहीत. त्यांची नावे सोमवार (ता.९) नंतर रद्द होणार असल्याने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा इथून पुढे मिळणारा लाभ हा कायमचा बंद होणार आहे.
"राहिलेल्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी व एनपीसीआय बाकी असेल त्या सर्व शेतकरी बांधवांनी कृषी विभाग तसेच गावातील सरपंच किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करून तत्काळ ई-केवायसी व एमपीसीआय करून घ्यावी. अन्यथा ९ ऑक्टोबरनंतर सदर नावे रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल." - शुभम बेरड, तालुका कृषी अधिकारी, येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.