PM Modi Nashik Visit : पोलिसांनी घेतली आंदोलकांची धास्ती! प्रतिबंधात्मक नोटीसा जारी

नाशिक दौऱ्यात येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निदर्शने, आंदोलने करण्याच्या शक्यतेची धास्ती पोलीस यंत्रणेने घेतलेली आहे.
police security
police securityesakal
Updated on

नाशिक : कांदा निर्यातबंदीमुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. तर, दुसरीकडे बेरोजगारी, कामगार धोरणांमुळेही समाजातील काही घटकांमध्ये नाराजी आहे.

त्यामुळे या नाराज घटकांकडून नाशिक दौऱ्यात येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निदर्शने, आंदोलने करण्याच्या शक्यतेची धास्ती पोलीस यंत्रणेने घेतलेली आहे.

त्यापार्श्वभूमीवर शहर-जिल्हा पोलीसांकडून अनेकांना कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत. (PM Modi Nashik VIsit police took fear of protesters Prohibitory notice issued nashik)

नाशिकमधील तपोवनाता येत्या शुक्रवारपासून (ता.१२) युवा दिनानिमित्ताने राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या युवा महोत्सवाच्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. यादरम्यान औरंगाबाद रोडवर त्यांचा रोड शो होणार आहे.

तसेच, त्यानंतर ते पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार असून त्याठिकाणी मोदी यांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

दरम्यान, कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. परंतु केंद्र सरकारने कांद्याचे दर वाढल्यामुळे कांदानिर्यात बंदी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

कांदा निर्यादबंदी उठवावी यासाठी सातत्याने आंदोलन सुरू आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी नाशिकला येत असल्याने शेतकरी संघटना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलने, निदर्शने करण्याची शक्यता आहे.

police security
PM Modi Nashik Visit: पंतप्रधान मोदी रामतीर्थ अन श्री काळाराम मंदिरात करणार पूजा, महाआरती

अशा संभाव्य आंदोलनांची धास्ती शहर-जिल्हा पोलीसांनी घेतली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी शहर हद्दीमध्ये पोलीस आयुक्त जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये कलम १४९ अन्वये अनेकांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडून नोटीसा बजाविण्यात आल्या असल्या तरी काही आंदोलकांच्या हालचालीवर पोलिसांकडून करडी नजरही ठेवली जात आहे.

विशेष पथके शहरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा एका दिवसावर येऊन ठेपल्याने केंद्रीय गुप्तचर यंत्रणेसह राज्य गुप्तवार्ता विभागाची पथके शहरात दाखल झाली आहेत.

या पथकांकडून पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कार्यक्रमस्थळांसह आसपासच्या परिसरावर करडी नजर ठेवली जात आहे. शहरातील हॉटेल्स, लॉजेस्‌ याठिकाणी आलेल्यांची चौकशी केली जात आहे. 

police security
Nashik News : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू; पोलीस आयुक्तांकडून अधिसूचना जारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.