PM Modi Nashik Visit : कडेकोट सुरक्षेत पार पडला दौरा

रोड शोदरम्यान नागरिकांवर निगराणी ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या मनोऱ्यावरून लक्ष ठेवताना पोलिस.
Police personnel patrolling from a roadside building during a road show on Chhatrapati Sambhajinagar Road.
Police personnel patrolling from a roadside building during a road show on Chhatrapati Sambhajinagar Road.esakal
Updated on

PM Modi Nashik Visit : रोड शोदरम्यान नागरिकांवर निगराणी ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या मनोऱ्यावरून लक्ष ठेवताना पोलिस.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा ठरल्यापासून पोलिस यंत्रणेसह केंद्रीय सुरक्षायंत्रणेकडून सज्जतेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या. (pm narendra modi tour was conducted under tight security by police nashik news)

पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या विशेष सुरक्षा पथकाचे (एसपीजी) पथक गेल्या चार दिवसांपासून शहरात ठाण मांडून होते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेसह राज्य गुप्तवार्ता विभागाचे अपर महासंचालक दर्जाचे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेले होते. नाशिकमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्तासाठी पहाटे सहावाजेपासून दुपारी चारवाजेपर्यंत पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आलेले होते.

छत्रपती संभाजीनगर रोडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो असल्याने या रस्त्यावर विशेष सुरक्षा पथकांचे अधिकाऱ्यांकडून कसून तपासणी करण्यात आली होती. सभास्थळी जाणाऱ्यांची मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून तपासणी झाल्यानंतर प्रवेश दिला जात होता. याशिवाय श्री काळाराम मंदिर, रामतीर्थ येथेही कडेकोट सुरक्षा लावण्यात आलेली होती.

Police personnel patrolling from a roadside building during a road show on Chhatrapati Sambhajinagar Road.
PM Modi MP Visit : बिरसी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात चर्चा

अभेद्य सुरक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवेळी अभेद्य अशी सुरक्षा यंत्रणा सज्ज होती. रोड शोसाठी ज्या वाहनातून पंतप्रधान मोदी जात होते, त्याआधी विशेष कमांडो पथकासह शस्त्रसज्ज वाहन धावत होते. रोड शोचे वाहन रस्त्याच्या मधोमध धावत असताना, विशेष सुरक्षा पथकांची दोन्ही बाजूने कर्मचारी चालत होते.

मोदी यांच्या वाहनांभोवती विशेष सुरक्षा पथकाचे साध्या वेशातील अधिकारी चालत होते. त्याचवेळी त्यांचे रस्त्यालगतच्या नागरिकांवर करडी नजर होती. त्याचप्रमाणे, छत्रपती संभाजीनगर रोडवरील इमारतींवरून पोलिस दुर्बिणीद्वारे लक्ष ठेवून होते. नागरिकांसाठी असलेल्या रस्त्यावरही मनोरे उभारून त्यावरून पोलिस नागरिकांवर लक्ष ठेवून होते.

Police personnel patrolling from a roadside building during a road show on Chhatrapati Sambhajinagar Road.
PM Modi Nashik Visit : राजकीय क्षेत्रातून मोदींच्‍या उमेदवारीचे स्‍वागत; विकासाची गती वाढणार असल्‍याचा विश्‍वास

दृष्टीक्षेपात बंदोबस्त

- विशेष सुरक्षा पथकाचे ४४ कमांडोंचे पथक

- केंद्रीय सुरक्षा बलाचे पथक

- राज्य राखीव दलाचे पथक

- राज्य राखीव पोलिस दलाचे पथक

- शहर पोलिस आयुक्त, चार उपायुक्त, सात सहायक आयुक्तांसह सुमारे १२०० अधिकारी-कर्मचारी

- ग्रामीण पोलिस अधीक्षकांसह अपर अधीक्षक, २०० अधिकारी-कर्मचारी

- परजिल्ह्यातून आलेले २ हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी.

- राज्य विशेष सुरक्षा विभागाचे अपर महासंचालक, चार विशेष पोलिस महानिरीक्षक

- केंद्रीय गुप्तचर यंत्रणा व राज्य गुप्तचर विभागाचे अधिकारी, कर्मचारी

- पोलिस आयुक्तालयाची दहशतविरोधी पथक, डॉगस्क्वॉड, राज्य गुन्हेअन्वेषण विभाग (सीआयडी), शीघ्रकृती दल, दंगलविरोधी पथक

Police personnel patrolling from a roadside building during a road show on Chhatrapati Sambhajinagar Road.
PM Modi Nashik Visit: काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदी नतमस्‍तक; 'सीयावर रामचंद्र की जय'च्‍या घोषणांनी दुमदुमला परिसर

बंदोबस्त असा...

विशेष कृती दल (एसपीजी) : ४४ कमांडोचे पथक

शहर पोलिस : आयुक्त, चार उपायुक्त, सात सहायक आयुक्त, चाळीस निरीक्षक, अडीचशे अधिकारी, आठशे कर्मचारी

ग्रामीण पोलिस : अधीक्षक, दोन अपर अधीक्षक, आठ उपविभागीय अधिकारी, तीस निरीक्षक, पाचशे अधिकारी-कर्मचारी

राज्यातून दाखल : शंभर अधिकारी व १९०० पोलिस कर्मचारी

सुरक्षा अधिकारी : अपर पोलिस महासंचालक, चार विशेष पोलिस महानिरीक्षक, दहा उपविभागीय अधिकारी तथा सहायक आयुक्त

इतर पथके : शहर-ग्रामीण गुन्हे शाखा, राज्य गुप्तवार्ता (एसआयडी), राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी), शीघ्र कृती दल (क्यूआरटी), दंगल नियंत्रण पथक (आरसीपी), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ)

Police personnel patrolling from a roadside building during a road show on Chhatrapati Sambhajinagar Road.
Narendra Modi Nashik Visit: PM मोदींच्या स्वागतासाठी दादांचे तीन पावले नृत्य, व्हिडिओ व्हायरल...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.