PM Vishwakarma Scheme : विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारपासून (ता.१७) देशात बलुतेदार कारागिरांसाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरु झाली. नाशिकला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा शुभारंभ झाला.
आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना कार्डाचे वाटप झाले. दरम्यान कार्यकारिणी निवडीतील नाराजीने भाजपच्याच अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने तो चर्चेचा विषय ठरला. (PM Vishwakarma launched in Nashik Activities for 13 lakh artisans nashik)
महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या कार्यक्रमाला आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, राजेंद्रकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, भाऊसाहेब साळुंखे, महापालिका आयुक्त अशोक करंजकर, सुनील बच्छाव, भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदीप पेशकार आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. पवार यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्ताने कविता सादर करीत २०२७-२८ आर्थिक वर्षापर्यत देशातील बलुतेदार घटकातील ३० लाख कारागिरांना ओळखपत्र, कौशल्य विकास प्रशिक्षण, कर्ज वितरण, कॅशलेस व्यवहारावर सवलत अशा स्वरूपाच्या योजनेमुळे विकास साधला जाणार असल्याचे सांगितले.
आमदार फरांदे यांनी पंतप्रधानाच्या सन्मानार्थ कविता सादर करीत आता ‘हर घर मोदीच नव्हे तर चांदपर भी मोदी’ अशी चर्चा सुरु झाल्याचे सांगितले.
अठरा समूहांसाठी योजना
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, सुतार, सोनार, कुंभार, लोहार यासह १८ बलुतेदार कारागिरांसाठी सुरु केलेल्या योजनेत ओळखपत्र, कौशल्य विकास, कर्ज मदत, अवजारे भेट, कॅशलेस व्यवहार अशा स्वरूपाची मदत केली जाणार आहे.
प्रातिनिधीक स्वरूपात हेल्थ कार्ड, पीएम आवास, स्वनिधी योजनेतील मीना माडे, भास्कर चौधऱी, कल्पना कराळे, दीपक तिरमाडे, विनायक वाघेरे आदीसह लाभार्थ्यांनी कार्डाचे वाटप झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आमदार ढिकले फिरकलेच नाही..
कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाचे प्रसारण झाले.
वाढदिवसानिमित्ताने घर घर मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. अनेक वक्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यगौरवाच्या कविता सादर केल्या, पण त्याचवेळी भाजपमधील पदाधिकारी निवडीतील नाराजीचा प्रभावही कार्यक्रमावर दिसला.
आमदार राहुल ढिकले फिरकलेच नाही. आमदार सीमा हिरे उशिरा हजेरी लाऊन निघून गेल्या. भाजपचे मोजके पदाधिकारी वगळता भाजप कार्यकारिणी नियुक्तीतील नाराजीमुळे कार्यक्रमाकडे भाजप कार्यकर्त्यांनी मात्र पाठ फिरविली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.