Pocket Forest : सिन्नरमध्ये साकारणार पॉकेट फॉरेस्ट! वनप्रस्थच्या घनवन प्रकल्पाचे भूमिपूजन

President of Rotary Club of Nashik City Prafulla Bardia during the Bhoomipuja of Vanprastha's Ghanforest Project
President of Rotary Club of Nashik City Prafulla Bardia during the Bhoomipuja of Vanprastha's Ghanforest Projectesakal
Updated on

Pocket Forest : रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटीच्या माध्यमातून व रिंग प्लस अँक्वा बेअरिंग लि.च्या सीएसआर निधीतून सिन्नरमध्ये पंधरा गुंठे जागेवर वनप्रस्थ फौंडेशनतर्फे पॉकेट फॉरेस्ट साकारण्यात येत आहे.

यातून शहरात राहून जंगलाची अनुभूती घेता येणार आहे. या अनोख्या प्रकल्पात नागरिकांना जॉगींगसाठी ट्र्कही असणार आहे. (Pocket Forest will realized in Sinner Bhoomipujan of Vanprastha Ghanforest Project nashik news)

श्री. ज्वाला माता घनवन प्रकल्पाचे भूमिपूजन रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल बरडिया यांच्या हस्ते झाले. सचिव ओमप्रकाश रावत, रिंगप्लस अँक्वा बेअरिंग लिचे प्लॅन्ट हेड तथा सीएसआर कमिटीचे संचालक कमलाकर टाक, माजी नगरसेवक श्रीकांत जाधव, रोटरीचे उपप्रांतपाल उदय गायकवाड, माजी नगरसेवक संतोष शिंदे यांच्या उपस्थितीत झाले.

वनप्रस्थ फाऊंडेशनने सिन्नर नगरपालिकेचे तत्कालिन अधिकारी व पदाधिकारींच्या सहकार्याने शहरात दोन देवराई तयार केलेल्या असून त्यामाध्यमातून ११९ प्रकारच्या दुर्मिळ देशी प्रजातींच्या सुमारे दोन हजार रोपांची लागवड केली आहे.

वनप्रस्थ फाऊंडेशनचे स्वयंसेवक रोज सकाळी दोन तासांच्या श्रमदानातून त्यांचे संवर्धन करीत आहे. वनप्रस्थ फाऊंडेशनला शिर्डी रोड वरील ज्वालामाता लॉन्समागे, मुक्तेश्वरनगर येथील सुमारे पंधरा गुंठ्याच्या खुल्या जागेत (ओपन स्पेस) विद्यमान मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारणार आहे.

पॉकेट फॉरेस्ट या संकल्पनेवर सुमारे दोन हजार रोपांचे घनवन तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुमारे २० ते ३० प्रकारच्या देशी प्रजातींच्या रोपांची लागवड केली जाणार आहे.

नागरिकांना व्यायाम करण्यासाठी व फिरण्यासाठी चोहोबाजूंनी जॉगिंग ट्रॅकसाठी नियोजित जागा ठेवण्यात आलेली असून प्लॉटच्या आतील बाजूस एका छोट्या जंगलाची अनुभूती नागरिकांना मिळणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

President of Rotary Club of Nashik City Prafulla Bardia during the Bhoomipuja of Vanprastha's Ghanforest Project
Market Committee Election : बेरजेच्या राजकारणाने पहिली घंटा वाजली! विधानसभेच्या रंगीत तालमीचा अंक यशस्वी

वनप्रस्थ फाऊंडेशनचे वृक्षसंवर्धनाचे काम हे अतिशय कौतुकास्पद असून वनप्रस्थसोबत जोडले जाणे हे आमचे सौभाग्य असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल बरडिया यांनी केले.

या प्रकल्पाच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावणारे रिंग प्लस अँक्वाचे प्लॅन्ट हेड कमलाकर टाक यांनी आपण निमित्तमात्र असून प्रामाणिकपणे वृक्ष संवर्धन करणाऱ्या वनप्रस्थ फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना यापुढे देखील शक्य ते सहकार्य आणि मार्गदर्शन नक्कीच करू असे आश्वासित केले.

ओमप्रकाश रावत यांनीही शहरातील नागरिकांना आपल्याच भागात होणाऱ्या या प्रकल्पामुळे निसर्गाच्या कुशीत जाण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

संस्थेतर्फे अशा प्रकारचे अनेक पॉकेट फॉरेस्ट तयार करून त्यामाध्यमातून सिन्नर शहराची फुफ्फुसे मजबूत करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे डॉ. महावीर खिवंसरा यांनी प्रास्ताविकात सांगितले. दत्तात्रय बोऱ्हाडे यांनी अतिथींची ओळख करून दिली.

अनिल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संजय विशे यांनी आभार मानले. सोपान परदेशी, शिंदे, बढे, संजय आंबेकर, राजेंद्र क्षत्रिय, संतोष शेलार, वैभव पवार, नाना माळी, वैभव गुजराथी, संदीप खर्डे, नितीन खिवंसरा, मनोज भंडारी,

दीपक भंडारी, सचिन आडणे, सचिन कासार, गणेश तांबोळी, सौरभ आंबेकर, श्याम गवळी, अथर्व शेलार, मुक्ता देशमुख, मिताली खिवंसरा, अपूर्व जाधव, ढग्या डोंगर संवर्धन समितीचे जुगल लोया, नितीन कट्यारे, अमोल चव्हाण, संजय पाटील आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खतप्रकल्पाची वैशिष्ट्ये

- 15 गुंठे क्षेत्रात होणार सुमारे 2000 रोपांची लागवड

- सुमारे 20 ते 30 प्रकारच्या देशी प्रजातींचा असणार समावेश

- चारही बाजूने जॉगिंग ट्रॅक व ग्रीन जिम साठी नियोजित जागा

- घनवन वृक्षारोपण पध्दतीत कमी वेळात जास्तीत जास्त घनदाट जंगल तयार होणार

- नियमित श्रमदानातून होणार संवर्धन

- स्थानिक नागरिकांचा देखील लागणार हातभार

President of Rotary Club of Nashik City Prafulla Bardia during the Bhoomipuja of Vanprastha's Ghanforest Project
Success Story : एकाचवेळी सख्या बहिणींना खाकी वर्दी! दातलीच्या कडाळे भगीनींची भरारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.