Nashik News: कवी संदीप जगताप यांचा भुईभोग कवितासंग्रह अभ्यासक्रमात!

Sandip Jagtap & Bhuibhog
Sandip Jagtap & Bhuibhogesakla
Updated on

Nashik News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कवी संदीप जगताप यांचा ‘भुईभोग’ कवितासंग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत असणाऱ्या मॉडेल कॉलेजच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे.

जगताप चिंचखेड (ता. दिंडोरी) येथील रहिवासी आहेत. २३ वर्षांपासून चिंचखेडसारख्या छोट्या गावात स्वतःची शेती करताना शेतकऱ्यांचे दुःख, वेदना व त्यावरील पर्याय सुचवणारी कविता संदीप जगताप यांनी लिहिली. (Poet Sandeep Jagtaps Bhuibhog poetry collection in course Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sandip Jagtap & Bhuibhog
Success Story: बागलाणच्या भूमिपुत्राने रशियात मिळवली MBBS पदवी

केवळ दुःख वेदना मांडून शेतकऱ्यांच्या जगण्यात बदल होणार नाही. म्हणून प्रश्नावर पर्याय सुचवणारी व शेतकऱ्यांना लढण्याचे बळ देणारी कविता संदीप जगताप यांनी लिहिली. २००९ मध्ये प्रकाशित झालेल्या भुईभोग कवितासंग्रहाला महाराष्ट्रातील मानाचे सात राज्य पुरस्कार मिळाले.

संदीप जगताप यांची कविता अभ्यासक्रमांपेक्षा जनतेमध्ये जास्त लोकप्रिय झाली. २०१७ च्या शेतकरी संपामध्ये संदीप जगताप यांची कविता शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतली. त्यानंतर जगताप यांनी शेतकरी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.

नंतरच्या अनेक आंदोलनांमध्ये संदीप जगताप यांची कविता प्रेरणादायी ठरली. संदीप जगताप हा कवी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लढणारा असल्यामुळे लोकांना स्वतःचा कवी वाटू लागला. एक लढणाऱ्या कवीचा कवितासंग्रह अभ्यासक्रमाला लागला याचा राज्यभरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Sandip Jagtap & Bhuibhog
Nashik News: सेतू अभ्यासक्रम निर्मितीत जिल्ह्यातील शिक्षकांचे योगदान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.