Pola 2023: सर्जा राजा रं, यंदा तुला कसा सजवू रं..! बाजारपेठ फुलली, पण दुष्काळामुळे सजावटीच्या वस्तूंना मागणी नाही

A shop of decorative bullocks for the beehive.
A shop of decorative bullocks for the beehive.esakal
Updated on

Pola 2023 : शेतकऱ्यांचा आवडता सण अशी ओळख असलेल्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट असून महागाई, पावसाची गैरहजेरीमुळे शेतकरी बांधव यंदा हिरमुसलेला आहे.

पावसाची समाधानकारक हजेरीची वाट पाहण्यात अर्ध्यापेक्षा अधिक हंगाम गेल्याने तो आर्थिक खाईत लोटला गेला आहे, त्यामुळे पारंपारिक पद्धतीने पोळा सण साजरा होणार की नाही अशी स्थिती आहे. (pola festival 2023 market flourished but due to drought no demand for decorative items nashik)

गाव व परिसरात पावसाने दडी मारली आहे. बागायती पिके वगळता अन्य पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. पोळा उंबरठ्यावर आला असला तरी शेतकरी आणि मजूर वर्गाच्या हातात पैसा नाही अन कामही. त्यामुळे पोळा यावर्षी जेमतेमच साजरा होणार अशी स्थिती आहे.

भाववाढीमुळे वर्दळीच्या बाजारपेठा रोडावल्या आहेत. बाजारपेठेत शुकशुकाटामुळे सणावेळी ग्रामीण भागातून विविध वस्तू खरेदीसाठी होणारी गर्दी दिसून येत नसल्याने व्यापारी वर्गात निराशा आहे. पुरणपोळीचा गोड घासही महागला आहे.

बैलांच्या सजावटीसाठी आवश्यक विविध वस्तूंच्या दरातही वाढ झाली नसली तरी दुष्काळसदृश परिस्थिती, वाढती महागाईमुळे सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. सजावटीच्या वस्तूंना मागणी नसल्यामुळे भांडवल निघेल की नाही याची व्यापारींना चिंता आहे.

ट्रॅक्टर शेतीमुळे बैलांचे प्रमाण आधीच कमी झाले आहे. त्यांच्या किमतीही लाखाच्या पुढे गेल्या आहेत. सर्व वस्तू महाग झाल्या आहेत. गाव परिसरात पाऊस नसल्याने बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंना मागणी नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A shop of decorative bullocks for the beehive.
Bail Pola Festival 2023 : शेतकऱ्यांच्या बैलपोळ्याला महागाईचा चटका! साहित्याच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ

वस्तूंचे दर असे ः लहान ते मोठे गोंडे ५१० रुपये, शिंगांची शापे पितळी १००० रुपये, गळ्यातील पितळी साखळी २५० ते२ ७० रुपये, मोरखी १००० रुपये, घुंगरू साखळी १०० रुपये, पायातील पैंजण २५० रुपये, शिंगांची शापे प्लास्टिक २५० रुपये, घुंगरू पैंजण ४० रुपये जोडी, नाथा ४० रुपये असे दर आहेत.

"गाव परिसरात पाऊस नसल्याने बैलांच्या सजावटीच्या साहित्याला मागणी नाही. रविवार बाजाराचा दिवस राहूनसुद्धा पाचशे रुपयाची विक्री झाली नाही. २५ रुपये रंग डबी, १० रुपयाचे फुगे, २० रुपये जोडी माळा, १० रुपये नामपुरी गुलाल व्यतिरिक्त इतर वस्तूंचा उठाव नाही. त्यामुळे भांडवल सुद्धा निघण्याची शक्यता नाही."

- दादाभाऊ शेलार, साहित्य विक्रेते, येसगाव बुद्रुक.

A shop of decorative bullocks for the beehive.
Tanha Pola: नागपूरच्या सगळ्यात मोठ्या लाकडी बैलाने वेधले साऱ्यांचे लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.