Saykheda Police Station : पोलिस 25, भार 32 गावांचा! सायखेडा पोलिस ठाण्याची स्थिती

Police station building nearing completion
Police station building nearing completionesakal
Updated on

Saykheda Police Station : गोदाकाठ भागातील सायखेडा येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३२ गावांचा भार अवघ्या पंचवीस पोलिसांवर आहे. लाखाच्या आसपास लोकसंख्येसाठी सायखेडा पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आलेली असताना देखील चार हजार नागरिकांच्या संरक्षणासाठी अवघा एक पोलिस कर्मचारी कर्तव्य निभावत असल्याचे दृश्य आहे.

तरीही बत्तीस गावांची कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम पोलिस चोखपणे पार पाडत आहेत. (Police 25 load 32 villages Status of Saikheda Police Station nashik news)

भौगोलिकदृष्ट्या निफाड तालुक्याचा विस्तार मोठा असल्याने निफाड, लासलगाव, पिंपळगाव, ओझर व सायखेडा पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. सध्या सायखेडा पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक एक, उपनिरीक्षक एक, अधिकारी व कर्मचारी भार सांभाळत आहेत.

त्यात गोदाकाठभागातील चेहडीपासून तारुखेडलेपर्यंत विखुरलेली आहे. गुन्ह्यांचा आलेखही कमी-जास्त होत असतो. यासाठी मनुष्यबळ मंजूर असताना अवघे पंचवीस संख्याबळ उपलब्ध आहेत. तरी देखील तिन्ही ऋतुंमध्ये सायखेडा पोलिस ठाणे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी वेळप्रसंगी चोविस तास कर्तव्य निभावत आहेत.

सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळात एक सहायक पोलिस निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक असे दोन अधिकारी तर २३ कर्मचारी नियुक्त आहेत. त्यांच्या हद्दीमध्ये सुमारे लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली ३२ गावे येतात.

त्यांचे संरक्षण करण्याची आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी अवघ्या २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पार पाडावी लागत आहे. यामध्ये गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

विशेष म्हणजे त्यांच्याच हद्दीतून नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग, ओझर शिर्डी मार्ग जात असल्याने अपघातांचे गुन्हेही नियंत्रित करावे लागतात. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाने याची दखल घेऊन विस्तीर्ण असलेल्या गोदाकाठ भागातील सायखेडा पोलिस ठाण्यासाठी मंजूर पदांची लवकरात लवकरात नियुक्ती करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Police station building nearing completion
Success Story: तमाशातील वगनाट्याने घडवले ऋषीकेशचे आयुष्य! ऋषीकेश व अनिकेतचा प्रेरणादायी संघर्ष

यामुळे उपलब्ध मनुष्यबळावरील ताण-तणाव कमी होवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे सोपे होवून आणि कायदा-सुव्यवस्था व्यवस्थितरित्या हाताळण्यास मदत होईल. सायखेडा पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून नवीन इमारती बरोबरच गोदाकाठ भागाच्या संरक्षणासाठी मंजूर पदांचे कर्मचारी नियुक्त करावेत.

सायखेडा पोलिस ठाणे

अंतर्गत ४ बिट ३२ गावे

सायखेडा बिट ः सायखेडा, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, भुसे, मांजरगाव, सोनगाव.

चांदोरी बिट ः चांदोरी, नागापूर, नारायणगाव, चितेगाव, दारणा सांगवी, वह्रेदारणा, शिंपी टाकळी, लालपाडी, चेहडी, गोंडेगाव

चाटोरी बिटः चाटोरी, रामनगर, पिंपळगाव निपाणी, सावळी, महाजनपूर, तळवाडे, भेंडाळी, औरंगपूर, श्रीरामपूर.

म्हाळसाकोरे बिट ः म्हाळसाकोरे, खानगाव थडी, तारूखेडले, तामसवाडी, करंजी, ब्राम्हणवाडे.

Police station building nearing completion
Nashik: अधिकारी निवृत्त अन चौकशींचा फेरा कायम; उत्तर महाराष्ट्रातील प्रकरणांच्या निपटाऱ्याचा प्रश्‍न अनुत्तरीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.