Nashik News: अमली पदार्थांविरोधात पोलिस आक्रमक; महिनाभर विशेष अभियान राबविणार

Drugs seized Crime
Drugs seized CrimeSakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असते.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांकडून धडक कारवाई सुरू असताना, आता ऑगस्टमध्ये अमली पदार्थांविरोधातही ‘ॲक्शन मोड’मध्ये येत विशेष अभियान राबविले जाणार आहे.

त्यामुळे तस्करी करून चोरीछुप्यारितीने प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, शहर आयुक्तालय हद्दीतही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अमली पदार्थांची घुसखोरी होत असते. ग्रामीण पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे यास आळा बसण्याचीही शक्यता आहे. (Police aggressive against drugs special campaign will conducted for month Nashik News)

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पदभार घेतल्याच्या पहिल्या दिवसापासूनच जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात उघडपणे मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील ४० पोलिस ठाणेअंतर्गत सुरू असलेल्या अवैध व्यवसायांसंदर्भात थेट नागरिकांना निनावी माहिती देण्याचे आवाहन अधीक्षक उमाप यांनी केले. अधीक्षकांनी नेमलेल्या स्वतंत्र पथकांकडून थेट कारवाई होत आहे.

यामुळे जिल्ह्यातील गावठी दारूअड्डे, मद्यपींचे पार्सल ढाबे, जुगार-मटकाअड्डे पोलिसांनी उद्‍ध्वस्त केल्याने अवैध धंद्यांना आळा बसला आहे. गेल्या सात महिन्यांत दारूबंदीच्या कायद्याखाली दोन हजार ८४८ केसेस केल्या आहेत. तर चार कोटी सहा लाख दहा हजार ६१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मात्र, त्याचवेळी प्रतिबंधित गुटख्यांची जिल्हाभर सर्रासपणे चोरीछुप्यारितीने विक्री होते. यासंदर्भात अधीक्षकांच्या आदेशानुसार थेट धाडसत्र राबवून आत्तापर्यंत कोट्यवधींचा गुटखा पोलिसांनी कारवाई करीत जप्त केला आहे.

यात १७८ संशयितांविरोधात १६९ गुन्हे दाखल करीत कारवाईत सुमारे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमली पदार्थांविरोधात कारवाईसाठी आणखी कडक धोरण ग्रामीण पोलिसांनी अवलंबिले असून, येत्या ३१ तारखेपर्यंत अमली पदार्थविरोधी अभियान राबविण्याचा निर्धार केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Drugs seized Crime
Nashik News : संवेदनशील शिक्षकांमुळे कोकिळला मिळाले जीवदान!

म्होरक्या नाशिकचा

इगतपुरी पोलिसांनी सव्वा कोटींच्या प्रतिबंधित गुटख्या प्रकरणी गुटखा किंग राज भाटिया याला जयपूरमधून अटक केली होती.

त्याच्या चौकशीतून महाराष्ट्रात गुटखा तस्करीचे रॅकेट चालविणारा नाशिकचा चिमुकला कार्यकर्ता तुषार जगताप यालाही ग्रामीण पोलिसांनी गेल्या जूनमध्ये अटक केली होती. गुटखा तस्करीचे मोठे रॅकेटच राज्यात असल्याचे यातून समोर आले होते.

शहरात बसेल आळा

शहर आयुक्तालय हद्दीतही गेल्या काही दिवसांपासून प्रतिबंधित गुटख्याविरोधात आयुक्तांनी दंड थोपटले आहेत. शहराभोवती असलेल्या जिल्ह्याच्या हद्दीतूनच अमली पदार्थाची घुसखोरी होत असते. ग्रामीण पोलिसांकडून आत्तापर्यंत कोट्यवधींचा गुटखा पकडला.

त्या तुलनेत शहरात कारवाई कमी आहे. मात्र, ग्रामीण पोलिसांनीच जिल्ह्यात कडक धोरण अवलंबून धडक कारवाई केली, तर शहरात येणाऱ्या गुटख्याला आळा बसू शकणार आहे. गेल्या काही दिवसांत शहर पोलिसांनीही शहरातील पानटपऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवून कारवाई सुरू केली आहे.

"जिल्ह्यातून अवैध व्यवसायांसह प्रतिबंधित अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता असून, ६२६२२५६३६३ या हेल्पलाइनवर माहिती कळवावी. माहिती देण्याचे नाव विचारले जाणार नाही. पोलिसांकडून संबंधित अवैध व्यवसायाविरोधात थेट कारवाई केली जाईल."

- शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

Drugs seized Crime
Nashik News : विनयभंगाच्या आरोपातून तत्कालीन प्रांताधिकारी निर्दोष!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()