नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (narayan rane) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता असून त्यांना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलीसांनी दिले आहेत. दरम्यान राणेंच्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून आता राणे विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच तापल्याचं दिसत आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक नाशिकमध्ये आक्रमक नाशिकमधील भाजपच्या कार्यालयावर (ता.२४) दगडफेक झाली. याबाबत चौकशी करून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत नाशिकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी माहिती दिली होती. दरम्यान भाजप कार्यालयावर दगडफेक केलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पुणे, नाशिक, महाड आणि औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान नाशिकमध्ये भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांचा कोणताही बंदोबस्त नसल्याने चारचाकी कार्यालयातून आलेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत काचा फोडल्या आणि तेथून निघून गेले. आमच्या कुटुंबप्रमुखाचा अपमान झाला असल्याचं यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं.
राणे विरुद्ध शिवसेना वाद पेटला
महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात नारायण राणेच्या विरोधात आंदोलन होणार असून राणेंच्या घराबाहेर मोठ्या संख्येनं युवासैनिकांनी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिकसह मुंबईच्या प्रत्येक वॅार्डमध्ये आंदोलनाची तयारी सुरु असून ठिकठिकाणी राणेंच्या विरोधात होर्डिंग लावण्यात आले आहेत.
...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानाखाली लगावली असती'; नारायण राणेंची जीभ घसरली
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.