नाशिक : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत वाढत्या दुचाकी चोरीला अटकाव करण्यासाठी सकाळ- सायंकाळ कडेकोट नाकाबंदी (Police Blockade) केली जात आहे. असे असतानाही दुचाकी चोरीच्या (Bike theft) घटना सुरूच असून, पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हानच उभे राहिलेले असतानाच नाकाबंदी फोल ठरतेय, अशी टीका होऊ लागली आहे. (police Blockade in city still bike theft continues Nashik crime news)
पोलिस आयुक्तालय हद्दीतील अंबड, नाशिक रोड आणि भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्या आहेत. सामनगाव रोडवरील भोर मळ्यातून बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेली. योगेश भोर (रा. भोर मळा, नाशिक रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी २१ जूनला सिन्नर फाटा येथील बालाजी ढाबा येथील पार्किंगमध्ये त्यांची इनफिल्ड बुलेट (एमएच- १५- एफएल- १००९) पार्क केली होती. सदर बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष दातरे (रा. महेश भवनजवळ, सिडको) यांची दुचाकी (एमएच- १५- एझेड- ३४२०) सोसायटीच्या पार्किंगमधून २७ जूनच्या मध्यरात्री चोरीला गेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कडाळे (रा. राजवाडा, बेळगाव ढगा, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या २० जूनला भद्रकालीतील रसूल बाग कब्रस्तान परिसरात आले होते. या वेळी त्यांची दुचाकी (एमएच- १५- एफझेड- ८८८७) रात्री साडेदहाच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाकाबंदी फोल?
शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे शहर पोलिसांवर टीका होऊ लागली आहे. शहरात पोलिस ठाणेनिहाय कडेकोट नाकाबंदी लावलेली आहे. मुख्य रस्त्यांसह कॉलनी व उपरस्त्यांवरही बॅरिकेटींग करून कसून तपासणी पोलिसांकडून होते आहे. अशी नाकाबंदी असतानाही चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नाकाबंदीही फोल ठरत असल्याने पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.