नाशिक : सीआयएसएफ भरतीत डमी उमेदवार

उमेदवारांमध्ये खळबळ, उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल
Police case registered against dummy candidate of CISF recruitment
Police case registered against dummy candidate of CISF recruitmentsakal
Updated on

नाशिक : नाशिक रोड येथे नेहरूनगरच्या मैदानावर सीआयएसएफ भरतीत आलेल्या डमी उमेदवाराविरुध्द उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे उमेदवारांमध्ये खळबळ उडाली असून प्रत्येक उमेदवार तपासा अशी मागणी उमेदवार यांनी केली आहे. संशयित अर्शद अहमद (२४, होलाराम कॉलनीसमोर, कस्तुरबानगर, साधू वासवानी रोड,नाशिक) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

नेहरूनगर येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) कर्मचारी भरत कौशिक यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार जेलरोड येथील मैदानावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी २१ मेला भरतीसाठी आलेला उमेदवार अर्शद अहमद याची बायोमेट्रीक तपासणी करण्यात आली.

त्याचे छायाचित्र व हाताचे ठसे घेण्यात आले. हे ठसे व छायाचित्र हे यापूर्वी लेखी परीक्षेच्या वेळेस घेतलेले ठसे तसेच फोटोशी जुळत नसल्याचे कर्मचा-यांच्या लक्षात आले. लेखी परीक्षा दिलेली व्यक्ती आणि आज मैदानी परीक्षेस आलेला अर्शद अहमद या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या असल्याचे स्पष्ट झाले. कर्मचा-यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. उपनगर पोलिसांना कळविण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर अर्शद अहमदची चौकशी करून त्याच्याविरुध्द उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

आधी परीक्षा दिलेला कोण?

या आधी परीक्षा दिलेला उमेदवार कोण होता याचा तपास पोलिस निरीक्षक विजय पगारे (गुन्हेशाखा) करत आहेत. दरम्यान परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांची खातर जमा करून परीक्षा प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. प्रसंगावधान राखत डमी उमेदवार पकडून दिल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.