Nashik Crime News : चोरट्याकडून दीड लाखांच्या दुचाक्या हस्तगत

theft
theftesakal
Updated on

नाशिक : गंगापूर रोड परिसरातून दुचाकी चोरून नेणाऱ्या संशयिताला सरकारवाडा पोलिसांनी शिताफीने पकडले असता, पोलीस चौकशीतून त्याच्याकडून चोरीच्या आणखी चार दुचाक्याचे गुन्हे उकल झाले आहेत. (police caught suspect who stole 2 wheeler from Gangapur Road area 4 more cases of theft were caught Nashik crime news)

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आयुश राजेश राका (२०, मुळ रा. पिंपळनेर ता. साकी जि. धुळे) असे संशयित दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कोरडे (रा.भाविकनगर, श्रीरंग चौक, गंगापूर रोड) यांची यामाहा कंपनीची दुचाकी गेल्या २९ जानेवारी रोजी रात्री राहत्या घराच्या पार्किंगमधून चोरीला गेली होती. याप्रकरणी गेल्या मंगळवारी (ता. ३१) सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे पोलीस अंमलदार वायकंडे, चौधरी यांना संशयित राकाची खबर मिळाली होती. त्यासंदर्भातील माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांना दिली असता, गुन्हेशोध पथकाने याबाबत कारवाई करीत संशयित राका यास चोपडा लॉन्सच्या पाठीमागील मंगलवाडीतून अटक केली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

theft
Nashik MLC Election: नाशिकमध्ये सत्यजीत तांबेच निवडून येतील; अजित पवारांचा दावा

त्याच्याकडून चोरीची यामाहा दुचाकी हस्तगत करण्यात आली असता, त्याच्याकडे चौकशीत पोलीस खाक्या दाखविताच त्याने आणखी दुचाक्या चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण १ लाख ३५ हजार रुपयांच्या चोरीच्या चार दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

हस्तगत केलेल्या चोरीच्या दुचाक्या

यामाहा आर.एक्स. एमएच १५ - ३२२२,

होंडा एमएच १५ एफएक्स ९१५८,

यामाहा केएफझेड एमएच ४८-४५६३,

यामाहा केआरएक्स एमएच १५ डब्ल्यु ३६५७

theft
Graduate Election Result : आहे ग्रॅज्युएट तरी..! पदवीधर मतदानात मोठ्या संख्येने मतपत्रिका बाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.